अटी व शर्ती
आमचे App आणि संकेतस्थळ वापरण्याच्या अटी.
Update 7 सप्टेंबर 2026
आमचे संकेतस्थळ किंवा App वापरून तुम्ही खालील अटी मान्य करत आहात.
१. सेवेचे स्वरूप
स्पर्धा परीक्षा फाउंडेशन स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यास साहित्य, टेस्ट सिरीज आणि माहिती पुरवते. आम्ही कोणत्याही शासकीय संस्थेचे किंवा आयोगाचे अधिकृत प्रतिनिधी नाही.
२. खात्याची जबाबदारी
- खाते तयार करताना खरी माहिती द्यावी.
- तुमचा पासवर्ड गोपनीय ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे.
- एक खाते एकाच व्यक्तीने वापरावे. खाते सामायिक केल्यास ते बंद केले जाऊ शकते.
३. स्वीकारार्ह वापर
खालील गोष्टी करण्यास मनाई आहे:
- आमचे प्रश्न, नोट्स किंवा साहित्य कॉपी करून इतरत्र प्रसिद्ध करणे किंवा विकणे
- स्वयंचलित साधनांनी (bot, scraper) माहिती काढणे
- सेवेत तांत्रिक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे
- इतर वापरकर्त्यांना त्रास देणारा किंवा बेकायदेशीर मजकूर टाकणे
४. बौद्धिक संपदा
संकेतस्थळ व App वरील सर्व प्रश्न, स्पष्टीकरण, नोट्स, रचना आणि लोगो व नाव (नोंदणीकृत ट्रेडमार्क) यांचे हक्क स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कडे राखीव आहेत. वैयक्तिक अभ्यासासाठी वापर मुक्त आहे; व्यावसायिक पुनर्वापरासाठी लेखी परवानगी आवश्यक.
५. प्रीमियम सदस्यत्व
- सदस्यत्व ठराविक कालावधीसाठी असते आणि ते हस्तांतरणीय नाही.
- किंमती बदलण्याचा अधिकार राखीव आहे; बदल आधीच्या खरेदीला लागू होत नाही.
- परताव्याच्या अटींसाठी परतावा धोरण पहा.
६. माहितीची अचूकता
अभ्यासक्रम, तारखा, पात्रता व कट ऑफ याबाबतची माहिती आम्ही काळजीपूर्वक तयार करतो, मात्र अधिकृत जाहिरातच अंतिम मानावी. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ तपासा.
७. जबाबदारीची मर्यादा
आमच्या साहित्याच्या वापरातून मिळणाऱ्या परीक्षा निकालाची हमी आम्ही देत नाही. सेवेतील तांत्रिक व्यत्यय, माहितीतील त्रुटी किंवा तिसऱ्या पक्षाच्या दुव्यांमुळे होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.
८. सेवा बंद करण्याचा अधिकार
या अटींचा भंग झाल्यास पूर्वसूचनेशिवाय खाते बंद करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.
९. लागू कायदा
या अटींवर भारतीय कायदा लागू असून कोणताही वाद महाराष्ट्रातील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात येईल.
या पानाबाबत काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधा. संपर्क