कुकी धोरण
आम्ही नेमक्या कोणत्या कुकी वापरतो, त्या कशासाठी, आणि जाहिरातींसाठी एकही का नाही.
Update 7 सप्टेंबर 2026
अंमलात येण्याची तारीख: या पानावर शेवटी अद्ययावत केल्याची तारीख दिली आहे.
हे धोरण स्पर्धा परीक्षा फाउंडेशन च्या संकेतस्थळाला लागू आहे. आमच्या तिन्ही App मध्ये कुकी वापरल्या जात नाहीत — तिथे काय साठवले जाते ते गोपनीयता धोरणात दिले आहे.
१. थोडक्यात
आमचे संकेतस्थळ दोनच कुकी वापरते, आणि दोन्ही साइट चालण्यासाठी आवश्यक आहेत. जाहिरातींसाठी, तुमचा पाठलाग करण्यासाठी किंवा तुमची माहिती विकण्यासाठी आम्ही एकही कुकी वापरत नाही.
तिसऱ्या पक्षाच्या जाहिरात-कंपन्यांच्या कुकी आमच्या संकेतस्थळावर नाहीत.
२. आम्ही वापरतो त्या कुकी
| नाव | कशासाठी | किती वेळ |
|---|---|---|
XSRF-TOKEN |
फॉर्म खरोखर आमच्याच पानावरून भरला गेला आहे याची खात्री. याशिवाय दुसरे कोणतेही संकेतस्थळ तुमच्या नावाने आमच्याकडे फॉर्म पाठवू शकेल. | २ तास |
…-session |
तुम्ही लॉगिन केलेले असल्यास ते लक्षात ठेवते. लॉगिन नसाल तरी फॉर्ममधली माहिती व सूचना दाखवण्यासाठी लागते. | २ तास |
दोन्ही कुकी encrypt केलेल्या असतात, आणि session कुकी HttpOnly आहे — म्हणजे ती JavaScript ला वाचता येत नाही.
३. कुकी नसलेले, पण तुमच्या फोनवर साठवले जाणारे
काही गोष्टी कुकी नव्हे तर तुमच्याच browser मध्ये (localStorage) ठेवल्या जातात. त्या आमच्यापर्यंत कधीच पोहोचत नाहीत — त्या फक्त तुमच्या उपकरणावर राहतात:
| काय | कशासाठी |
|---|---|
spf-theme | तुम्ही गडद की उजळ रंगसंगती निवडली |
spf-reader-scale | तुम्ही अक्षरांचा आकार किती ठेवला |
spf-consent | तुम्ही कुकींबद्दलची सूचना वाचली का |
४. Analytics
या पानाच्या तारखेला आमच्या संकेतस्थळावर Google Analytics चालू नाही.
पुढे ते चालू करावे लागले, तर:
- ते फक्त पानांची पाहणी मोजेल — तुमचे नाव, ईमेल किंवा ओळख नाही
- तुमचा IP पत्ता अपूर्ण करून (anonymised) पाठवला जाईल
- हे पान त्याआधी अद्ययावत केले जाईल
५. आवश्यक कुकी नाकारता येतात का
प्रामाणिक उत्तर: नाही, आणि याचे कारण सांगणे योग्य ठरेल.
वरच्या दोन्ही कुकी सुरक्षेसाठी आहेत — एक फॉर्म खरा आहे का ते तपासते, दुसरी तुमचे लॉगिन टिकवते. त्या बंद केल्या तर संपर्क फॉर्म चालणार नाही आणि लॉगिन करता येणार नाही. त्या "सोयीसाठी" नाहीत, त्या साइट चालण्यासाठी आहेत.
तरीही तुम्ही तुमच्या browser मधून सर्व कुकी बंद करू शकता — फक्त तसे केल्यास लॉगिन आणि फॉर्म काम करणार नाहीत.
६. कुकी कशा काढायच्या
- Chrome (Android/संगणक) — Settings → Privacy and security → Clear browsing data → Cookies
- Firefox — Settings → Privacy & Security → Cookies and Site Data
- Safari (iPhone) — Settings → Safari → Clear History and Website Data
७. बदल
हे धोरण बदलल्यास वरची तारीख बदलेल. आम्ही नवीन प्रकारची कुकी वापरायला सुरुवात केली, तर ती वापरण्यापूर्वी हे पान अद्ययावत केले जाईल.
प्रश्न असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
या पानाबाबत काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधा. संपर्क