Search This Blog

Wednesday, 4 September 2019

प्रदूषण नियंत्रणात महाराष्ट्र प्रथम

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या प्रत्येक राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गुणवत्ता तपासणीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कामगिरी अव्वल ठरली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार तपासणी या वर्षी मे महिन्यात करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 82.93 टक्के गुण मिळवून प्रथम गुणवत्तेत प्रथम क्रमांक पटकावला. जानेवारी 2019 मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला देशभरातील सर्व प्रदूषण मंडळांच्या गुणवत्तेचे तपासणी करण्याचे आदेश दिले होते. पर्यावरणविषयक गुणवत्ता मापन, कायद्याची अंमलबजावणी आणि दैनंदिन व प्रतिबंधात्मक उपाययोजना, माहिती (डेटा) व्यवस्थापन व लोकसंपर्क, निर्णयक्षमता व संशोधन, प्रगती व प्रशिक्षण या मुद्दय़ांच्या आधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही तपासणी केली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डिजिटायझेशन, संगणकीय प्रणालीच्या ऑनलाइन सेवांमध्ये बदल, औद्योगिक आस्थापनांनी करावयाच्या अर्जाची संख्या कमी करण्यावर भर देऊन ईज ऑफ डुइंग बिझनेसला चालना आणि कर्मचारी व अधिकाऱ्यांची सकारात्मक मानसिकता यामुळे मंडळाने ही गुणवत्ता प्राप्त केली आहे.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
  • महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंध अधिनियम, 1969, च्या तरतुदीनुसार 7 सप्टेंबर 1970 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली.
  • महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (मप्रनिमं) विविध विधिविधानांचे व नियमांचे कार्यान्वयन करीत असते. 
  • महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे. 
महाराष्ट्र पूण नियंत्रण मंडळाची काही महत्वाची कार्ये :
  • प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण किंवा बंदी आणि त्याची सुरक्षितता यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करणे.
  • प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे व तीचा प्रचार करणे व त्याचा प्रतिबंध, नियंत्रण व बंद करणे.
  • सांड पाणी किंवा व्यापारी सांड पाणी व टाकावू पदार्थांच्या निपटाऱ्याच्या सुविधांचे तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धतीचे निरीक्षण करणे व ट्रिटमेंट संयंत्र, निपटाऱ्याच्या पद्धती तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धती या विषयीच्या योजना, विनिर्देश किंवा इतर माहितीचा आढावा घेणे.
  • प्रदूषण नियंत्रण, टाकावू पदार्थांचे रिसायकल करुन पुन्हा उपयोग घेणे, पर्यावरण अनुकूल पद्धती ईत्यादी क्षेत्रात होणाऱ्या विकासाला सहाय्य करणे व प्रोत्साहन देणे.
  • योग्य प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान व पद्धती द्वारे पर्यावरण वृद्धीसाठी उद्योजकांना शिक्षित करणे व मार्गदर्शन देणे.
  • स्वच्छ व स्वस्थ पर्यावरणा विषयी सार्वजनिक जागरुकता निर्माण करणे तसेच प्रदूषणा संबंधी सार्वजनिक तक्रारींची दखल घेणे.
  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष : सुधीर श्रीवास्तव
स्रोत: लोकसत्ता,महाराष्ट्र टाईम्स. www.mpcb.gov.in

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी