Search This Blog

Wednesday, 4 September 2019

सरकारी बँकांचे विलीनीकरण

थकीत कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सशक्त करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गतिमान करण्यासाठी गरजेची असलेली मोठी कर्जे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारने 10 सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय दि 30 ऑगस्ट रोजी घेतला. सरकारी बँकांच्या या महाविलीनीकरणामुळे देशात आता 12 मोठय़ा सार्वजनिक बँका कार्यरत राहतील. 2017 मध्ये ही संख्या 27 इतकी होती. भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी असून विलीनीकरणामुळे पंजाब नॅशनल बँक ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक होणार आहे. पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक यांच्या विलीनीकरणामुळे त्यांची एकत्रित उलाढाल 17.95 लाख कोटी रुपये इतकी होणार असून या तीन बँकांचा विस्तार पंजाब नॅशनल बँकेच्या दीडपट अधिक असेल. बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या दोन्ही सार्वजनिक बँक म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत राहतील.


विलीनीकरण झालेल्या बँका


नवी बँक- पंजाब नॅशनल बँक


 • पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटटल बँक आणि युनायटेड बँक
 • देशातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक बँक
 • एकूण आर्थिक उलाढाल-17.95 लाख कोटी
नवी बँक- कॅनरा बँक
 • कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक
 • देशातील चौथ्या क्रमांकाची सार्वजनिक बँक
 • एकूण आर्थिक उलाढाल- 15.20 लाख कोटी

नवी बँक- युनियन बँक
 • युनियन बँक, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक
 • देशातील पाचव्या क्रमांकाची सार्वजनिक बँक
 • एकूण आर्थिक उलाढाल-14.59 लाख कोटी
नवी बँक- इंडियन बँक
 • इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक
 • देशातील सातव्या क्रमांकाची सार्वजनिक बँक
 • एकूण आर्थिक उलाढाल- 8.08 लाख कोटी

कार्यरत राहणाऱ्या 12 बँका
स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसिस बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बँक.

यापूर्वी आठ बँकांचे विलीनीकरण
 • 2017 मध्ये भारतीय स्टेट बँकेत बिकानेर-जयपूर, म्हैसूर, त्रावणकोर, पटियाला आणि हैदराबाद या पाच संलग्न बँका तसेच महिला बँकेचे विलीनीकरण झाले होते.
 • 2018 मध्ये विजया बँक आणि देना बँकेच्या बँक ऑफ बडोदामधील विलीनीकरणाला मान्यता देण्यात आली होती. एप्रिल 2019 मध्ये ती अमलात आणली गेली.
 • सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणाची ही तिसरी फेरी आहे.
स्रोत: लोकसत्ता.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी