Search This Blog

Wednesday, 4 September 2019

रशियाने सादर केले पाचव्या पिढीचे Su-57E नावाचे अत्याधुनिक फायटर विमान

रशियाने अखेर एमएकेएस इंटरनॅशनल एअर शो मध्ये पाचव्या पिढीचे Su-57E हे अत्याधुनिक फायटर विमान सादर केले आहे. Su-57E या विमानाची अन्य देशांना विक्री करणार असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. संभाव्य खरेदीदार देशांबरोबर याबद्दल लवकरच चर्चा सुरु होणार आहे. सुखोईने Su-57E विमान विकसित केले आहे. अमेरिकेच्या F-35 स्टेल्थ विमानाला प्रतिउत्तर म्हणुन हे विमान विकसित करण्यात आले आहे.


Su-57E फायटर विमान : 
  • हवा आणि जमिनीवरील विविध टार्गेटसचा लक्ष्यभेद करणारे Su-57E हे पाचव्या पिढीचे एक बहुउपयोगी विमान आहे. 
  • दिवसा-रात्री, कुठल्याही वातावरणात या विमानाचा वापर करता येऊ शकतो. 
  • चौथ्या पिढीच्या फायटर विमानाशी तुलना करता रडारला चकवा देणारे स्टेल्थ तंत्रज्ञान या फायटर विमानामध्ये आहे. 
  • शत्रूच्या रडारवर हे विमान सापडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात घुसून हल्ला करणे अधिक सोपे होईल. 
  • यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, शस्त्रास्त्राची सिस्टिम आणि सुपरसॉनिक वेग Su-57E ला अधिक घातक बनवते. 
  • २९ जानेवारी २०१० साली Su-57E ने पहिले उड्डाण केले होते. 
स्रोत: लोकसत्ता

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी