Search This Blog

Wednesday, 4 September 2019

पुण्याचे मनोज मुकुंद नरवणे लष्कर उपप्रमुखपदी

 • लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज दि.1 सप्टेंबर 2019 रोजी 13 लाख सैन्य असलेल्या भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला.मनोज नरवणे यांनी लेफ्टनंट जनरल डी अंबू यांची जागा घेतली आहे.लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
 • नरवणे महाराष्ट्राचे असून ते मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे.ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत.
 • महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून जून 1980 रोजी ते लष्कराच्या 7 व्या शीख बटालियनमध्ये रुजू झाले होते. 
 • जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
 • नरवणे यांनीआपल्या 37 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध कमांडमध्ये काम केले, यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली.
 • यापूर्वी, ते चीनलगतच्या भारताच्या जवळपास 4000 किमी सीमेची काळजी घेणार्‍या आर्मीच्या पूर्व कमांडचे प्रमुख होते. 
 • जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय रायफल्स आणि पूर्व आघाडीवरील इन्फंट्री ब्रिगेड या बटालियनचीही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 
 • श्रीलंकेत ऑपरेशन पवन दरम्यान ते भारतीय शांति सेनेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता.तसेच तीन वर्ष म्यानमारमधील भारतीय दूतावासात भारताचा संरक्षण सहकारी म्हणून काम केले आहे. 
 • “अत्यंत आव्हानात्मक भागात काम करण्याचा त्यांचा दीर्घकाळ अनुभव आहे.” असे सेनेच्या प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे.
सन्मान
 • लष्कराच्या प्रशिक्षण कमांडच्या जीओसी-इन-सी(GOC-in-C) म्हणून केलेल्या विशिष्ट सेवांबद्दल 2019 ला त्यांना 'परम विशिष्ठ सेवा पदक' देऊनही गौरविण्यात आले. 
 • प्रतिष्ठित स्ट्राइक कॉर्प्स चे नेतृत्व करण्याबद्दल 2017 ला 'अतिविशिष्ट सेवा पदक' देखील प्रदान करण्यात आले आहे
 • नागालँडमधील आसाम रायफल्स (उत्तर) महानिरीक्षक म्हणून प्रतिष्ठित सेवेसाठी विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.
 • जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या बटालियनची कमान प्रभावीपणे सांभाळल्याबद्दल त्यांना सैन्य पदक प्रदान करण्यात आले आहे.
स्रोत: लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स,दै जागरण,The Hindu.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी