
तामिळनाडूतील कंदांगी साडी आणि दिंडीगुल लॉक यांना जीआय टॅग देण्यात आले.
डिंडीगुल लॉक
- डिंडीगुल लॉक त्यांच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी आणि टिकाऊपणासाठी जगभरात ओळखले जातात,
- या मुळेच या शहराला लॉक सिटी देखील म्हटले जाते.
- तामिळनाडूच्या कारागृह, गोदामे, रुग्णालये आणि मंदिरामध्ये दिंडीगुलचे कुलूप वापरले जातात.
कांदंगी साडी
- शिवगंगा जिल्ह्यातील संपूर्ण कराईकुडी तालुक्यात कांदंगी साड्या तयार केल्या जातात.
- साड्या साधारणत: सुमारे 5.10 मीटर -5.60 मीटर लांबीच्या असतात.
- या साड्या मध्ये चमकदार पिवळसर, केशरी, लाल आणि कमीतकमी काळ्या रंगाच्या मोठ्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर्स असतात.
- या सूती साडीचा वापर उन्हाळ्यात होतो.
GI TAG
- जीआय टॅग एखाद्या विशिष्ट क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार्या वस्तू साठी किंवा उत्पादनास दिले जाते. एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट ठिकाणी आढळत असेल किंवा ते त्याचे मूळ ठिकाण असेल तर अश्या वस्तुंना GI टॅग दिला जातो. .
- जीआय टॅग त्यांच्या कृषी उत्पादनांच्या विशिष्ट गुणवत्तेसाठी, नैसर्गिक वस्तू आणि उत्पादित वस्तूंसाठी दिला जातो.
- ही जीआय नोंदणी 10 वर्षांसाठी वैध असते, नंतर त्याचे नूतनीकरण करावे लागेल.
स्रोत: The Hindu.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी