Search This Blog

Wednesday, 4 September 2019

हिमाचल प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2019

  • हिमाचल प्रदेश विधानसभेने "हिमाचल प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2019" एकमताने मंजूर केले. 
  • या विधेयकात जबरदस्ती, प्रलोभन, विवाह किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने धर्मांतर करण्यास मनाई केली आहे
  • विधेयकानुसार,ज्या कोणालाही धर्मांतर करायचे आहे त्याला जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यास त्यासंबंधी एक महिन्याआधी नोटीस देणे बंधनकारक आहे.
  • या विधेयकात सक्तीने धर्मांतर केल्यावर 7 वर्षांच्या तुरूंगवासाची तरतूद आहे.आधीच्या कायद्यात फक्त 3 वर्षाची तरतूद होती.
  • हे विधेयक , 'हिमाचल प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा 2006' ची जागा घेईल, हा कायदा वीरभद्र सरकारने लागू केला होता.
हिमाचलप्रदेश
  • राजधानी:शिमला,धर्मशाळा (हिवाळ्यासाठी दुसरी राजधानी)
  • विधानसभा निवडणू 2017 मध्ये 68 पैकी 44 जागा मिळवून भाजप ने पूर्ण बहुमत मिळवले होते.
  • 1971 ला राज्याचा दर्जा.त्या आधी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा होता.
  • मुख्यमंत्री: जय राम ठाकूर (BJP)
  • राज्यपाल: बंडारू दत्तात्रेय (नवीन नियुक्ती 1 सप्टेंबर 2019)
(टीप: 2017 मध्ये हिमाचल प्रदेश ने 'धर्मशाळा' ही हिवाळ्यासाठी दुसरी राजधानी म्हणून जाहीर केली आहे. दोन राजधान्या असलेले हे तिसरे राज्य आहे,पाहिले जम्मू काश्मीर आणि दुसरे महाराष्ट्र.)


स्रोत: The Hindu.wiki.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी