Search This Blog

Wednesday, 4 September 2019

भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.ते महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल असतील.सी. विद्यासागर राव यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती, त्यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. 

भगत सिंह कोश्यारी
 • भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील नामती चेतबागड गावात झाला. झाला. 
 • उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे.
 • उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. 
 • 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला.
 • 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 
 • 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. 
 • भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.
 • त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते शिक्षक आणि पत्रकारही होते.
 • 1975 मध्ये पिथोरागडहून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पीयूष' साप्ताहिकाचे ते संस्थापक तसेच प्रबंध संपादक होते. 

महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणाच्या राज्यपालपदाच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नवीन राज्यपाल 
 1. भगत सिंह कोश्यारी : महाराष्ट्र 
 2. कलराज मिश्रा : राजस्थान 
 3. बंडारू दत्तात्रय : हिमाचल प्रदेश 
 4. आरीफ मोहम्मद खान : केरळ 
 5. तमिलीसाई सौंदराजन : तेलंगणा 
कालराज मिश्रा 
 • कालराज मिश्रा काही काळापूर्वीपर्यंत हिमाचलचे राज्यपाल होते. 
 • कालराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारकही आहेत.ते केंद्र आणि यूपी सरकारमधील कॅबिनेट मंत्री होते. 
 • सन २०१० ते २०१२ पर्यंत ते प्रदेश भाजपाचे प्रभारी होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे प्रभारी होते. 
 • ते तीन वेळा राज्यसभेचे खासदार आणि एकदा देवरियाचे लोकसभेचे सदस्य होते. 
बंडारू दत्तात्रेय 
 • बंडारू दत्तात्रेय भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त आंध्र प्रदेश युनिटचे अध्यक्ष राहिले आहेत. 
 • मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते कामगार आणि रोजगार मंत्री होते. 
 • 1965 मध्ये ते आरएसएसमध्ये दाखल झाले. आणीबाणीच्या वेळी ते तुरूंगातही गेले होते. 
आरिफ खान 
 • आरीफ खान दोनदा कॉंग्रेसमध्ये,तसेच जनता पक्ष व बसपाकडून प्रत्येकी एकदा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. 
 • शाह बानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल करण्याच्या कायद्याच्या विरोधात राजीव गांधी सरकार ला त्यांनी राजीनामा दिला होता. 
 • 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2007 मध्ये त्यांनी भाजप सोडला आणि राजकारणापासून अलिप्त झाले. 
 • तिहेरी तालक तसेच कलम 370 वर आरिफ खान यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले होते. 
तमिलीसाई सौंदराजन 
 • या व्यवसायाने डॉक्टर आहेत. 
 • यापूर्वी त्यांनी तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. 
 • या नियुक्तीपूर्वी ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव होत्या. 
 • त्यांना ‘तमिळनाडूच्या सुषमाजी’ म्हणून ओळखले जाते. 
स्रोत: The Hindu.The Indian Express,लोकसत्ता,महाराष्ट्र टाईम्स,दै.जागरण.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी