भारताचे श्रेष्ठ हॉकीपटू ध्यानचंद यांचा वाढदिवस, म्हणजे 29 ऑगस्ट हा दिवस,राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.आज त्यांची 114 वी जयंती आहे.मेजर ध्यानचंदला त्याच्या उत्कृष्ट हॉकी खेळाबद्दल हॉकीचा जादूगार म्हणतात.

मेजर ध्यानचंद
- जन्म : 29 ऑगस्ट 1905
- मृत्यू : 3 डिसेंबर 1979
- ध्यानचंद यांनी 1928 (अॅमस्टरडॅम), 1932 (लॉस एंजल्स) आणि 1936 (बर्लिन) या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदके जिंकली.
- लॉस एंजल्समध्ये खेळलेल्या भारतीय संघाचे तर एका अमेरिकी पत्रकाराने 'पूर्वेकडचे वादळ' असे वर्णन केले होते.
- 1926 ते 1948 दरम्यानच्या कारकिर्दीत त्यांनी 400 हून अधिक गोल केले.
- 1952 मध्ये त्यांचे 'गोल' हे आत्मचरित्र प्रकाशित झाले.
- ध्यानचंद 1956 मध्ये लष्करातून निवृत्त झाले. त्याच वर्षी केंद्र सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पारितोषिकाने गौरवले.
- त्यांची नंतर पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत मुख्य हॉकी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी या संस्थेत आणि देशातील अनेक ठिकाणच्या शिबिरांमध्ये अनेक वर्षे प्रशिक्षण दिले.
- त्यांच्या स्मृतीत 'मेजर ध्यानचंद पुरस्कार' देण्यात येतो.
- सुरुवात: 2002
- हा पुरस्कार त्या खेळाडूंच्या सन्मानार्थ देण्यात येतो ज्यांनी आपल्या कामगिरीद्वारे खेळासाठी योगदान दिले आहे आणि सक्रिय क्रीडा कारकीर्दीतून निवृत्तीनंतर सुद्धा ते खेळाच्या प्रगती साठी योगदान देत आहेत.
- पुरस्काराचे स्वरूप: पुरस्कारात विजेत्यास एक प्रतिमा , प्रमाणपत्र, पुरस्कार सोहळ्यासाठी वेशभूषा व 5 लाख रुपये रोख दिले जातात
- मॅन्युएल फ्रेडीक्स (हॉकी),
- अरुप बसाक (टेबल टेनिस),
- मनोज कुमार (कुस्ती),
- नितीन किर्तने (टेनिस),
- सी. लाल्रेमसंगा (तिरंदाजी)
स्रोत: लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स,The Hindu.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी