Search This Blog

Monday, 2 September 2019

फिट इंडिया अभियान

  • देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त "फिट इंडिया अभियान" सुरू केली. यावेळी क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते उपस्थित होते.
  • नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानात फिट इंडिया अभियानाचा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी फिट इंडियासारख्या अभियानाची जगातील प्रत्येक राष्ट्राला गरज असल्याचे सांगितले.
  • या प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे,यामुळे देशातील लोकांचे आरोग्य सुधारेल.पंतप्रधान म्हणाले की तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहिल्यामुळे लोकांच्या शारीरिक हालचालींमध्ये लक्षणीय घट झाली आहे आणि बरेच लोक त्यांच्या आरोग्याबाबत उदासीन आहेत. 
  • रक्तदाब आणि मधुमेह यासारखे अनेक रोग कमी शारीरिक हालचाली आणि जीवनशैलीमुळे उद्भवू शकतात, जीवनशैली बदलून आणि शारीरिक क्रियाकलाप आणि व्यायामाद्वारे या आजारांना टाळता येऊ शकतो. 
  • चीन, ऑस्ट्रेलिया, यूके, अमेरिका आणि जर्मनी यासारख्या देशांमध्येही असे कार्यक्रम चालवले जात आहेत.
स्रोत: लोकसत्ता,महाराष्ट्र टाईम्स.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी