Search This Blog

Wednesday, 4 September 2019

कॅरी बी. म्युलिस यांचे निधन

  • कॅरी बी. म्युलिस यांचे 7 ऑगस्ट 2019 ला निधन झाले.
  • ‘पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन’ (PCR) या डीएनए विश्लेषणाच्या तंत्रशोधासाठी 1993 साली त्यांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  • म्युलिस यांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग एका डीएनए रेणूच्या लाखो प्रती मिळवण्यासाठी करतात. गुन्हे संशोधनातही त्याचा बराच उपयोग होत आहे. 
  • विसाव्या शतकातील एक महत्त्वाचा शोध म्हणून ‘पीसीआर’चा उल्लेख केला जातो. अगदी 40 हजार वर्षांपूर्वीच्या गोठवलेल्या डीएनएपासून सजीवाची ओळख पटवणारे हे तंत्र आहे.
  • त्यांनी जॉर्जिया तंत्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेतले आणि पुढे कॅलिफोर्निया विद्यापीठातून जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. मिळविली. 
  • स्फोटके व विष तयार करण्याची प्रयोगशाळा म्युलिस यांनी उभारली होती. नंतर मेंदूच्या लहरींवर चालणारे एक स्विच तयार केले होते. पुढे काही काळ त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या,
  • त्यांनी ‘सीटस कार्पोरेशन’ या जैवतंत्रज्ञान कंपनीत त्यांनी काम केले. तिथल्या सहाएक वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पीसीआर तंत्राचा शोध लावला.
  • ‘डान्सिंग नेकेड इन द माइंड फील्ड’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी