Search This Blog

Wednesday, 4 September 2019

पाकिस्तानने केली गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी

  • पाकिस्तानने दि.29 ऑगस्ट ला जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या गझनवी या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. कराचीजवळील सोनमियानी फ्लाइट टेस्ट रेंजमध्ये याची चाचणी करण्यात आली.
  • अण्वस्त्रासह विविध वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम असलेल्या गझनवीची पृष्ठभागापासून 290 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता आहे.
  • या क्षेपणास्त्र चाचणीसाठी पाकिस्तानने कराची शहरातील हवाई क्षेत्राचा काही भाग 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवला होता.
  • पाकिस्तानने या चाचणीआधी नोटॅम (नोटीस टू एअरमेन) जारी केला होता.नोटॅमच्या नोटीसमध्ये आंतरराष्ट्रीय विमानांना कराची हवाई हद्दीतील तीन मार्गांवरुन विमान वाहतूक टाळण्याचे निर्देश दिले होते.
काय असते बॅलेस्टिक क्षेपणास्त्र?
  • क्षेपणास्त्रांचे विविध निकषांवर आधारित अनेक प्रकार पडतात. क्रूझ क्षेपणास्त्रे साधारणपणे हवेतून एखाद्या ग्लायडरसारखा प्रवास करतात. तर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तोफेच्या गोळ्यासारखी वक्राकार रेषेत प्रवास करत असल्याने त्यांना बॅलिस्टिक म्हणतात.
  • या क्षेपणास्त्राचा आकार प्रचंड मोठा असतो आणि ते मोठ्या वजनाचे बाँब वाहून नेऊ शकतात. एकदा सोडल्यानंतर हे क्षेपणास्त्र नष्ट करता येत नाही.
  • बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासोबत त्याचे इंधनही असते आणि त्यात वापरला जाणारा ऑक्सिजनही सोबतच असतो.
  • बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्यानंतर हवेमध्ये अर्धचंद्राकार मार्गानं आगेकूच करतो आणि रॉकेटसोबत त्याचा संपर्क तुटल्यानंतर त्यावर असलेला बाँब गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावामुळं जमिनीवर पडतो.याच कारणामुळं एकदा सोडल्यानंतर या क्षेपणास्त्राच्या लक्ष्यावर कोणतेच नियंत्रण राहत नाही.
  • बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर हा मुख्यत्वे अणुबाँब वाहून नेण्यासाठी होतो, मात्र कधीकधी पारंपरिक हत्यार वाहून नेण्यासाठीदेखील ही क्षेपणास्त्रं वापरली जातात.
स्रोत: लोकसत्ता,महाराष्ट्र टाईम्स,BBCमराठी.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी