Search This Blog

Monday, 19 August 2019

IAF स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल पुरस्कार जाहीर

 • बालाकोट एअर स्ट्राइक आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी फायटर विमानांबरोबरच्या डॉगफाइटमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आयएएफच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 • २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतात घुसली होती. त्यावेळी झालेल्या डॉगफाइटमध्ये मिंटी यांनी वॉर रुममधून विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना मार्गदर्शन केले होते.
 • युद्धाच्या काळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी युद्ध सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
 • त्या २६ आणि २७ फेब्रुवारीच्या दोन्ही मिशनमध्ये सहभागी झाल्या होत्या. विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान आकाशात झेपावल्यानंतर त्यांच्याबरोबर माझा संवाद चालू होता असे मिंटी अग्रवाल यांनी सांगितले. 
 • २७ फेब्रुवारीच्या सकाळी एकूण सात फाईटर कंट्रोलर डयुटीवर तैनात होते. मिंटी अग्रवाल या त्या टीममध्ये होत्या. पाकिस्तानी फायटर विमानांना रोखण्यासाठी आकाशात झेपावलेल्या इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांच्या त्या कंट्रोलर होत्या.
 • आकाशात नेमकी काय स्थिती आहे. पाकिस्तानी फायटर विमान कुठे, कुठल्या दिशेला आहेत त्याची माहिती त्या भारतीय वैमानिकांना देत होत्या. 
 • मिंटी अग्रवाल यांनीच विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना माघारी फिरण्यास सांगितले होते. पण पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर विमानांमध्ये कम्युनिकेशन सिस्टिम जॅम करण्याची यंत्रणा असल्यामुळे अभिनंदन यांच्यापर्यंत तो संदेश पोहोचलाच नाही.
युध्द सेवा पदक
 • स्थापना: 26 जून 1980
 • प्रदाता : भारत चे राष्ट्रपती
 • युध्द सेवा पदक हा युद्धकाळातील भारत सरकार द्वारा दिला जाणार एक प्रतिष्ठित सैन्य सन्मान आहे. 
 • युद्ध, संघर्ष किंवा शत्रुत्व संदर्भातील ऑपरेशन संबंधित विशिष्ट सेवेसाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो.
 • हा सन्मान विशिष्ट सेवा पदकाच्या समांतर आहे तसेच हे पदक मरणोत्तरही जाऊ शकते.


स्रोत: लोकसत्ता,नवभारत टाइम्स.indianairforce.nic.in

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी