Search This Blog

Monday, 19 August 2019

स्वच्छ सर्वेक्षण 2020

 • केंद्रीय गृह निर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते 13 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत स्वच्छ सर्वेक्षण 2020चे उद्‌घाटन झाले.
 • या मंत्रालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाचे हे पाचवे वर्ष आहे. 
 • या उद्‌घाटनासोबतच पुरी यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020-साधने, स्वच्छ भारत अभियान वॉटर प्लस प्रोटोकॉल आणि टूल किट, ‘स्वच्छ नगर’ या घनकचरा व्यवस्थापन ॲपचे उद्‌घाटनही केले.आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित एमएसबीएम ॲपचे सुद्धा उदघाटन केले.
 • यावेळी स्वच्छ सर्वेक्षण संकल्पनेविषयीचे एक गीतही प्रसारीत करण्यात आले.
 • 2020 च्या सर्वेक्षणाला जानेवारी महिन्यापासून सुरुवात होणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण गीत 
 • शीर्षक :  'स्वच्छता अधिकार आहे'
 • गायक: कैलाश खेर आणि मोनाली ठाकुर
 • अभिनय: अभिनेत्री कंगना राणावत
MSBM APP
 • हे ऍप राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) द्वारे विकसित केले आहे.
 • या प्रोग्राममध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कृत्रिम बुद्धिमत्ता च्या मदतीने अपलोड केलेल्या  फोटो मध्ये लाभार्थीचा चेहरा आणि टॉयलेट सीट ओळखण्यास मदत करते. 
 • हे रिअल टाइम अँप आहे.तसेच याद्वारे वेळेची बचत होणार आहे.

स्रोत : PIB

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी