Search This Blog

Tuesday, 27 August 2019

केंद्रिय दक्षता आयोगाने स्थापन केले बँकिंग घोटाळ्यांसंबंधी सल्लागार मंडळ (ABBF)


केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) 50 कोटी रुपयांहून अधिक बँकांच्या घोटाळ्याची तपासणी करण्यासाठी आणि कारवाईची शिफारस करण्यासाठी सल्लागार मंडळ स्थापन केले आहे. हे सल्लागार मंडळ, वाणिज्यिक आणि आर्थिक फसवणूक सल्लागार मंडळाची पुनर्रचना करुन स्थापन करण्यात आले आहे.

Advisory Board for Banking Frauds (ABBF)

रचना :
  • माजी दक्षता आयुक्त टी. एम. भसीन हे या चार सदस्यीय मंडळाचे अध्यक्ष असतील.
  • इतर सदस्यांमध्ये मधुसूदन प्रसाद (माजी नगरविकास सचिव), डी. के. पाठक (सीमा सुरक्षा दलाचे माजी महासंचालक) आणि सुरेश एन. पटेल (आंध्र बँकेचे माजी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी) यांचा समावेश असेल.
  • अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 21 ऑगस्ट 2019 पासून दोन वर्षांसाठी असेल.
कार्येः
  • संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे (पीएसबी) केंद्रीय अन्वेषण मंडळ (सीबीआय) सारख्या तपास यंत्रणांना शिफारशी किंवा संदर्भ देण्यापूर्वी सर्व प्रमुख फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये ABBF प्रथमिक चौकशी करणे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकां 50 कोटींपेक्षा जास्त मोठ्या घोटाळ्याची प्रकरणे ABBF कडे पाठवतील आणि त्यांकडून शिफारस मिळाल्यावर संबंधित बँक पुढील कार्यवाही करेल.
  • ABBF वेळोवेळी आर्थिक यंत्रणेतील फसवणूकीचे विश्लेषण देखील करेल आणि रिझर्व्ह बँकेला फसवणूकीशी संबंधित धोरण तयार करण्यासाठी माहिती देईल.
मुख्यालय आणि सेवा:
  • त्याचे मुख्यालय दिल्लीत असेल. आरबीआय या मंडळाला आवश्यक त्या सचिवात्मक सेवा, विश्लेषणात्मक आणि लॉजिस्टिक सपोर्ट तसेच आवश्यक निधी पुरविणार आहे.
पार्श्वभूमी :

  • सीव्हीसीने याची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या एनपीए संबंधी स्थापन केलेल्या वाय.एम. मालेगम समितीच्या शिफारसींवरआधारित केली आहे.
स्त्रोत : The Hindu, Economic Times

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी