- भारत सरकार ची "डीप ओशन मिशन" ला मान्यता. 31 ऑक्टोबर पासून हे मिशन सुरू होईल.
- पंचवार्षिक योजना, 8000 कोटींच्या निधी ची तरतूद
- खोल समुद्रात धातू आणि खनिजांचा शोध घेणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
- यूएन इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटीने (UN International Sea Bed Authority) ने मध्य हिंद महासागरात Poly Metallic Nodules (PMN) च्या शोधासाठी 75,000 चौरस किलोमीटर क्षेत्र दिले आहे.
- या मोहिमेमध्ये खोल समुद्र अन्वेषण, पाण्यात बुडलेली वाहने, बुडलेली रोबोटिक्स, समुद्रातील हवामान बदल इत्यादी संदर्भात काम केले जाईल.
- भारताचा एक्सक्लूसिव इकॉनॉमिक झोन (EEZ) 2.2 दशलक्ष चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. यामध्ये भारताचे विशाल सागरी क्षेत्र आहे, ज्याचे अद्याप संशोधन झालेले नाही.
- Poly Metallic Nodules (PMN) या खडकांमध्ये लोखंड, निकेल, मॅंगनीज आणि कोबाल्ट सारखे धातू आढळतात.
- या खडकांपैकी फक्त 10 % खनिजे जरी काढली तर पुढचे 100 वर्ष ऊर्जेची गरज भागेल असा अंदाज आहे.
- एका अंदाजानुसार, मध्य हिंद महासागर खोऱ्यात (Central Indian Ocean Basin) अंदाजे 380 दशलक्ष मेट्रिक टन पॉलिमेटिक नोड्यूलचा साठा आहे.
Friday, 2 August 2019
डीप ओशन मिशन
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी