- चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या अॅथलेटिकी मिटिंक रेयटर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ३०० मीटर शर्यतीत महिलांमध्ये हिमा दासने आणि पुरुषांमध्ये मोहम्मद अनासने सुवर्णपदकाची कमाई केली.
- २ जुलैपासून हिमाने युरोपीयन शर्यतींमध्ये मिळवलेले हे सहावे सुवर्णपदक ठरले. यापैकी पाचवे सुवर्ण तिने चेक प्रजासत्ताकमधील नोव्हे मेस्टो येथे झालेल्या ४०० मीटर शर्यतीत जिंकले होते.
- अनासने ३२.४१ सेकंद वेळ नोंदवत पुरुषांचे सुवर्णपदक प्राप्त केले.
- दोहा येथे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पध्रेच्या ४०० मीटर प्रकारासाठी राष्ट्रीय विक्रमवीर अनास आधीच पात्र झाला आहे. परंतु हिमाला अद्याप पात्र होता आलेले नाही.
- नवी दिल्लीत भारतीय अॅथलेटिक्स महासंघातर्फे ५ सप्टेंबरला नवी दिल्लीत इंडियन ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले असून, जागतिक अजिंक्यपद स्पध्रेसाठी पात्र होण्याकरिता ही अखेरची संधी असेल.
- मोहम्मद अनस यास 2019 चा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
हिमा दास
जन्म: 9 जानेवारी 2000 (वय: १९)रहिवासी: धिंग,नागाव,आसामप्रशिक्षक: निपुण दासस या
जुलै २०१८ मध्ये फिनलंड ,20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक .अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.तिने ५१.४६ सेकंदांची वेळ नोंदवली.
२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच हिमाने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवले. ५०.७९ सेकंदात ही शर्यत पूर्ण करून तिने राष्ट्रीय विक्रम नोंदवला.याच स्पर्धेत एक सांघिक रौप्य आणि एक सांघिक सुवर्ण जिंकले होते.
जुलै २०१९ मधील हिमाचे सुवर्णयश1) २ जुलै : पोझनान अॅथलेटिक्स ग्रांप्री, पोलंड - २०० मी. (२३.९५ सेकंद)2) ७ जुलै : कुत्नो अॅथलेटिक्स स्पर्धा, पोलंड - २०० मी. (२३.९७ से.)3) १३ जुलै : क्लादनो स्पर्धा, चेक प्रजासत्ताक - २०० मी. (२३.४३ से.)4) १७ जुलै : टाबोर स्पर्धा, चेक प्रजासत्ताक - २०० मी. (२३.२५ से.)5) २० जुलै : नोव मेस्टो ग्रांप्री, चेक प्रजासत्ताक - ४०० मी. (५२.०९ सेकंद)
स्रोत: लोकसत्ता, PIB
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी