Search This Blog

Monday, 19 August 2019

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र

पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) अभिनंदन यांना वीरचक्र पदक प्रदान केले जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘वीरचक्र’साठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

वीरचक्र :
  • देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र ही पदके देऊन सन्मानित करण्यात येते.
  • असा सम्मान देण्याची सुरूवात 1947 मध्ये झाली.
  • आतापर्यंत 1322 लोकांना वीर चक्र देण्यात आले आहे. यापूर्वी 1999 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता.

मिंती अग्रवाल यांना युद्ध सेवा पदक
  • अभिनंदन यांच्या व्यतिरिक्त स्क्वॉड्रन लीडर मिंती अग्रवाल यांना युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे.
  • बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मिंती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
स्त्रोत : लोकसत्ता, The Hindu

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी