Search This Blog

Wednesday, 7 August 2019

महाराष्ट्र शासनाचे आदिवसी खेळाडूंसाठी "मिशन शक्ती"

 • आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय (जसे की ऑलम्पिक) स्पर्धांसाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने "मिशन शक्ती" चा उपक्रम सुरू केला आहे.
 • चित्रपट अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन केले.
 • हा कार्यक्रम महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात राबविला जाणार आहे त्यानंतर राज्याच्या इतर भागातही सुरू केला जाणार.
 • या कार्यक्रमादरम्यान आमिर खानने "मिशन शौर्य" अंतर्गत माउंट एव्हरेस्टवर चढणार्‍या आदिवासी गिर्यारोहकांचा गौरव केला.
मिशन शक्ती
 • 2024 च्या ऑलिम्पिकसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
 • हा उपक्रम प्रामुख्याने तिरंदाजी, नेमबाजी, व्हॉलीबॉल, पोहणे, वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिकला प्रोत्साहन देईल.
 • यामध्ये जिल्हा स्तरीय सुविधांच्या विकासासाठी निधी ची तरतूद.
 • आंतराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट च्या प्रशिक्षकांचे सहकार्य मिळेल.
मिशन शौर्य
 • 8 एप्रिल 2018 ला हा महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाचा उपक्रम सुरू.
 • माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आश्रम शाळा मधील 10 विद्यार्थ्यांची निवड.
 • पैकी 5 जण माउंट एव्हरेस्ट सर करण्यात यशस्वी.
 • पहिल्या 5 जणांना प्रत्येकी 25 लाख रुपये पारितोषिक आणि बाकी 5 जणांना प्रत्येकी 10 लाख रुपये पारितोषिक म्हणून देण्यात आले.
स्रोत THE HINDU ,THE INDIAN EXPRESS. NAVBHARAT.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी