
‘एशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज कन्झव्र्हेशन’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार युनेस्कोचे संचालक एरिक फाल्ट यांच्या उपस्थितीत राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात स्वीकारला. भारतात एकूण 38 ऐतिहासिक वारसा वास्तू असून त्यांपैकी राजाबाई क्लॉक टॉवर व ग्रंथालय इमारतीचा जीर्णोद्धार अत्यंत उत्कृष्टरीत्या केला आहे. देशाला लाभलेल्या ऐतिहासिक वारशाची शास्त्रोक्त मांडणी करून ऐतिहासिक वारसा पर्यटनाला चालना देण्याची गरज असल्याचे मत युनेस्कोचे संचालक एरिक फाल्ट यांनी व्यक्त केले.
राजाबाई क्लॉक टॉवर :
- राजाबाई टॉवर दक्षिण मुंबईतील एक इमारत आहे.
- मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या निधीतून ही वास्तू उभारली आहे.
- हा निधी देताना त्यांनी त्यांची आई राजाबाई यांच्या नावेच ही वास्तू उभारली जावी अशी अट घातली होती. म्हणून ही वास्तू ‘राजाबाई टॉवर’ या नावाने ओळखली जाते.
- प्रेमचंद रॉयचंद यांची आई आंधळी होती आणि जैन धर्माचे कट्टर अनुयायी म्हणून त्यांनी संध्याकाळ होण्याच्या आधी रात्रीचे जेवण खाल्ले पाहिजे होते. असे सांगितले जाते की टॉवरच्या बेलने संध्याकाळी तिला कोणाच्याही मदतीशिवाय वेळ जाणून घेण्यास मदत होत असे.
- 1 मार्च,1869 रोजी या वास्तूची पायाभरणी झाली आणि नोव्हेंबर 1879 मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले.
- उंची : 85 मीटर (280 फूट किंवा 25 मजले)
- वास्तुविशारद: सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट.
- हा टॉवर मुंबईच्या व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बलचा एक भाग आहे,हा भाग 2018 मध्ये जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाला.
बांधकाम शैली
- राजाबाई टॉवरच्या बांधकामात वेनेटियन आणि गॉथिक या वास्तुकलेचे मिश्रण आहे.
- बांधकामासाठी कुर्ला येथील खाणीतील फिक्या पिवळ्या रंगाच्या दगडांचा वापर केला आहे.
- वास्तूच्या खिडक्यांसाठी रंगीत काचांचा (स्टेन्ड ग्लास) वापर केला आहे.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी