Search This Blog

Monday, 5 August 2019

भारतीय मानक ब्युरो ची लेह येथे पश्मीना चाचणी केंद्र स्थापन करण्याची घोषणा • पश्मिनाच्या गुणवत्तेची चाचणी करण्याच्या उद्देशाने भारतीय मानक ब्युरोने जम्मू आणि काश्मीरच्या लेहमध्ये पश्मिना चाचणी केंद्र स्थापित करण्याची घोषणा केली आहे.
 • लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (एलएडीडीसी) च्या संयुक्त विद्यमाने या केंद्राची स्थापना केली जाईल.
 • या केंद्रात मानक चाचणी प्रयोगशाळा, मशीन्स आणि शास्त्रज्ञ असतील.
पश्मीना
 • पश्मीना ही एक दर्जेदार काश्मिरी लोकर आहे.
 • पश्मीना हा एक काश्मिरी शब्द आहे ज्याचा अर्थ "मऊ सोने" आहे.
 • ही  शाल, स्कार्फ इत्यादी बनवण्यासाठी वापरला जातो.
 • काश्मीरमधील कारगिल ,चांगथांग क्षेत्रात आढळणाऱ्या मालरा नावाच्या बोकडापासून हे लोकर मिळते.
 • काश्मिर पश्मीनाला जीआय टॅग देखील प्राप्त आहे.
The Bureau of Indian Standards (BIS)
 • भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) ही (Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution) ग्राहक , अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालया अंतर्गत काम करणारी राष्ट्रीय मानक संस्था आहे.
 • त्याची स्थापना भारतीय मानक अधिनियम, 1986 ने केली आहे.
 • बीआयएस वर प्रशासकीय नियंत्रण असलेले मंत्रालय किंवा विभागाचे प्रभारी मंत्री हे  बीआयएसचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. 
 • रचनाःकेंद्र किंवा राज्य सरकारे, उद्योग, वैज्ञानिक आणि संशोधन संस्था आणि ग्राहक संस्थांकडून 25 सदस्य आहेत.
 • BIS भारतासाठी डब्ल्यूटीओ-टीबीटी WTO-TBT चौकशी बिंदू म्हणून देखील कार्य करते.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी