Search This Blog

Monday, 19 August 2019

मिशन बालाकोट यशस्वी करणाऱ्या ‘या’ पाच वैमानिकांचा ‘वायूसेना पदका’ने होणार सन्मान

  • फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रं उद्ध्वस्त केली. 
  • या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी झालेल्या हवाई दलाच्या पाच वैमानिकांचा त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी हवाई दलाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • विंगकमांडर अमित राजन, स्वाड्रन लिडर राहुल बसोया, पंकज भुजाडे, बी.एन.के रेड्डी आणि शशांक सिंग या वैमानिकांना हवाई दलाकडून वायूसेना पदक ( मेडल ऑफ गॅलेंट्री ) देण्यात येणार आहे.
  • २६ फेब्रुवारी बालाकोटमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये या वैमानिकांचा सहभाग होता.
  • मिराज- २००० या लडाऊ विमानांच्या तुकडीने २६ फेब्रुवारीच्या रात्री बालाकोट येथे हवाई हल्ला करत तेथील दहशतवादी तळ नष्ट केले होते.
  • भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा पार करत आठ किलोमीटरपर्यंत आतमध्ये जाऊन मिराज २००० च्या मदतीने स्पाइस २००० बॉम्ब निर्देशित करण्यात आलेल्या ठिकाणी पाडले होते. 
  • हल्ल्याच्या दिवशी ‘लो क्लाउड बेस’ म्हणजेच ढगाळ वातावरण असल्याने वैमानिकांना ‘क्रिस्टल मेज’ शस्त्राचा वापर करता आला नाही. मात्र लढाऊ विमानांमधील सहापैकी पाच स्पाइस २००० बॉम्ब या तुकडीने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रांवर टाकले.
स्त्रोत : लोकसत्ता

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी