
- 19 ऑगस्ट ला मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.
- त्यांनी 23 ऑगस्टला सहाव्यांदा राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
- राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर सिंग यांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2014 पर्यंत असणार आहे.
- मनमोहन सिंग हे 1991 पासून 2019 पर्यंत सलग राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत.
- भाजपाने मनमोहन सिंग यांच्याविरोधात उमेदवार उभा न केल्याने त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.
- मनमोहन सिंग यांची राजस्थानमधुन राज्यसभेवर निवड झाली आहे. यापूर्वी मनमोहन सिंग यांनी 28 वर्ष राज्यसभेमध्ये आसामचे प्रतिनिधीत्व केले.
- यंदा त्यांनी पहिल्यांदाच आसामच्या बाहेरून अर्थात राजस्थानातून राज्यसभेची निवडणूक लढवली आणि बिनविरोध निवडून आले.
- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन लाल सैनी यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.
- राज्यसभेतील त्यांचा कार्यकाळ यावर्षी 14 जून रोजी संपुष्टात आला होता आणि कॉंग्रेस पक्षाला पुन्हा आसाममधून राज्यसभेत पाठविण्याची ताकद नसल्यामुळे त्यांचे नामांकन होऊ शकले नाही तसेच इतर जागाही रिक्त राहिली नव्हती.
- राजस्थानमध्ये राज्यसभेच्या 10 जागा आहेत.त्यापैकी एक जागेवर मनमोहन सिंग यांची निवड झाली तर उर्वरित नऊ जागा भाजपकडे आहेत.
- गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या कॉंग्रेसला स्वतःचे 100 आमदार, 12 अपक्ष आणि 6 मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा आहे.
- 200 सदस्य संख्या असलेल्या राजस्थान विधानसभेत 73 आमदार असलेल्या भाजपने सिंगविरोधात उमेदवार न घेण्याचे निवडले. या पक्षाकडे राजस्थानमधून नऊपैकी राज्यसभेच्या दहा जागा आहेत.
स्रोत : लोकसत्ता, The Hindu
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी