Search This Blog

Friday, 2 August 2019

अधीर रंजन चौधरी यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती


 • लोकसभेत कॉंग्रेसचे पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांची लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती.
 • अधीर रंजन चौधरी हे लोकलेखा समितीत कॉंग्रेस पक्षाचे एकमेव सदस्य आहेत.
 • त्यांची नियुक्ती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे.

लोक लेखा समिती

 • लोक लेखा समिती ही एक संसदीय समिती आहे जी भारत सरकारच्या खर्चाचे लेखापरीक्षण करते.
 • या समितीची स्थापना 1921 मध्ये भारत सरकार अधिनियम 1919 नुसार केली.
 • या समिती मध्ये 22 सदस्य असतात, ज्यात 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे असतात.
 • या समितीचे अध्यक्ष लोकसभेच्या अध्यक्षांकडून नेमले जातात.
 • 1967 पर्यंत त्याचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचे होते, 1967 पासून त्याचे अध्यक्ष विरोधी पक्षाचे आहेत.
 • केंद्रीय मंत्री त्याचे सदस्य होऊ शकत नाहीत.
 • 17 व्या लोकसभेत कॉंग्रेस पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका गमावली. सर्व विरोधी पक्षांशी चर्चा केल्यानंतर लोकलेखा समितीचे अध्यक्षपद कॉंग्रेसला देण्याचे ठरले.
 • लोकलेखा समिती ही संसदेतील सर्वात मजबूत मानली जाणारी समिती आहे
 • कॉंग्रेसने लोक लेखा समिती (पीएसी) अध्यक्षपदी अधीर रंजन चौधरी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
 • पश्चिम बंगालच्या बहरामपूरमधून पाचव्यांदा खासदार म्हणून निवड. रंजन चौधरी हे कॉंग्रेसचे पक्षनेते आहेत.
 • यापूर्वी PAC चे अध्यक्ष, कॉंग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे होते


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी