
केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे अनुभव पुरस्कार 2019 प्रदान केले. या मालिकेतील हे चौथे वार्षिक पुरस्कार आहेत.
अनुभव पुरस्कारांबद्दल :
- हे पुरस्कार पेन्शन व पेन्शनर्स कल्याण विभागाकडून देण्यात येतात.
- हे पुरस्कार सेवानिवृत्त व्यक्तीला आपला बहुमूल्य अनुभव / सूचना लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दिले जातात.
पार्श्वभूमी :
- निवृत्त अधिकाऱ्यांचा/कर्मचाऱ्यांचा समृद्ध अनुभव डिजिटल स्वरुपात टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पेन्शन व पेन्शनर्स कल्याण विभागाने 'अनुभव' नावाचे पोर्टल सुरु केले.
- भावी पिढीला विशिष्ट प्रदेशाचा शासन, संस्कृती आणि विकासाच्या इतिहासाच्या विविध बाबींवरील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून त्याचे समृद्ध अनुभव जतन केले जावेत हा या पोर्टल सुरु करण्यामागचा हेतू आहे.
- या उपक्रमाचा एक भाग म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे लेखन-पत्र सादर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक पुरस्कार योजना 2016 मध्ये सुरू केली गेली होती. त्यानंतर आतापर्यंत तीन वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे.
स्रोत : The Hindu
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी