Search This Blog

Monday, 19 August 2019

पॅरालिम्पीकपटू दिपा मलिक, कुस्तीपटू बजरंग पुनियाला खेलरत्न पुरस्कार

  • पॅरा ऑलिम्पिकमधील पहिल्यांदा भारताला पदक मिळवून देणारी महिला अॅथलिट दीपा मलिक आणि राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱा कुस्तीपटू बजरंग पुनिया या दोघांना प्रतिष्ठेचा 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' जाहीर झाला आहे.
  • तर क्रिेकेटपटू रवींद्र जाडेजाला 'अर्जुन पुरस्कार' जाहीर झाला आहे. 
  • न्यायमूर्ति (सेवानिवृत) मुकुंदकम शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या 12 सदस्यीय निवड समितीने दोन दिवसांच्या बैठकीनंतर या  खेळाडूंची निवड केली आहे
  • 2015 साली बजरंगला अर्जुन तर 2019 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 
  • नुकत्याच पार पडलेल्या त्बिलिसी ग्रां प्रि स्पर्धेत बजरंगने इराणच्या पेइमन बिब्यानीला (65 किलो) पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. 
  • त्याआधी त्यानं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. 
  • बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदकं आहेत.
  • त्यानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते,तर 2018 मध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
  • 48 वर्षे वयाच्या दिपा मलिकने 2016 च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत (गोळा फेक- एफ 53 वर्ग) रौप्यपदकाची कमाई केली होती. 
  • याव्यतिरीक्त आशियाई खेळांमध्येही दिपाच्या नावावर 3 कांस्य आणि एक रौप्य पदक जमा आहे.

पुरस्कार विजेते खेळाडू 
राजीव गांधी खेल रत्न – (एकूण 2)
  1. बजरंग पुनिया ( कुस्ती) 
  2. दीपा मलिक (पॅरा अ‍ॅथलिट)

द्रोणाचार्य पुरस्कार (प्रशिक्षक) –  (एकूण 3)
  1. विमल कुमार (बॅडमिंटन),
  2. संदीप गुप्ता (टेबल टेनिस), 
  3. मोहिंदर सिंग ढिल्लोन (अ‍ॅथलिट)

द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार –  (एकूण 3)
  1. मेर्झबान पटेल (हॉकी), 
  2. रंबीर सिंग खोक्कर (कबड्डी), 
  3. संजय भरद्वाज (क्रिकेट)

अर्जुन पुरस्कार –  (एकूण 19)
  1. तजिंदरपाल सिंग तूर (अ‍ॅथलिट), 
  2. मोहम्मद अनास याहीया (अ‍ॅथलिट), 
  3. एस.भास्करन (बॉडीबिल्डींग), 
  4. सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), 
  5. रवींद्र जडेजा (क्रिकेट), 
  6. चिंगलेन साना (हॉकी), 
  7. अजय ठाकूर (कबड्डी), 
  8. गौरव सिंग गिल (मोटर स्पोर्ट्स),
  9. प्रमोद भगत (पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), 
  10. अंजुम मुदगील (शूटींग), 
  11. हरमित राजुल देसाई (टेबल टेनिस), 
  12. पूजा धांडा (कुस्ती), 
  13. फॉदा मिर्झा (इक्वेस्टेरियन),
  14. गुरप्रीत सिंग संधू (फुटबॉल), 
  15. पूनम यादव (क्रिकेट), 
  16. स्वप्ना बर्मन (अ‍ॅथलिट), 
  17. सुंदर सिंग गुर्जर (पॅरा अ‍ॅथलिट), 
  18. बी. साईप्रणित (बॅडमिंटन), 
  19. सिमरन सिंग शेरगिल (पोलो)


ध्यानचंद पुरस्कार – (एकूण 5)
  1. मॅन्युएल फ्रेडीक्स (हॉकी),
  2. अरुप बसाक (टेबल टेनिस),
  3. मनोज कुमार (कुस्ती),
  4. नितीन किर्तने (टेनिस),
  5. सी. लाल्रेमसंगा (तिरंदाजी)

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार  (एकूण 3)
  1. गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेश
  2. गो स्पोर्ट्स
  3. रायलसीमा डेव्हलपमेंट ट्रस्ट


मौलाना अबुल कलाम आझाद (माका) ट्रॉफी  (एकूण 3)
  1. पंजाब विद्यापीठ, चंदीगड - विजेते विद्यापीठ
  2. गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर - द्वितीय क्रमांक
  3. पंजाब विद्यापीठी, पतियाला - तृतिय क्रमांक

स्रोत : लोकमत,महाराष्ट्रटाइम्स,लोकमत.PTI.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी