
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये 'ऑर्डर ऑफ झायेद' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- क्राउन प्रिन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युएईचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.
- हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
- दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.
- या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला.
- यूएईने एप्रिल महिन्यात या पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची घोषणा केली होती.
'ऑर्डर ऑफ झायेद' पुरस्कार :
- ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
- राष्ट्रांच्या प्रमुखांना व राष्ट्रपतींना हा सन्मान देण्यात येतो .
- 2007 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन, 2016 मध्ये राणी एलिझाबेथ आणि 2018 मध्ये चिनी राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग यांच्यासह अनेक प्रमुखांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
- यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो.
UAE आणि भारत :
- सुमारे 60 अब्ज डॉलर्सच्या वार्षिक द्विपक्षीय व्यापारासह चीन आणि अमेरिकेनंतर युएई हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे.
- तसेच भारतासाठी कच्च्या तेलाचा चौथा क्रमांक निर्यात करणारा देश आहे.
- भारत संयुक्त अरब अमिरातीकडून एकूण तेलाच्या 8% आयात करतो.
- युएई मध्ये जवळपास 3.3 दशलक्ष भारतीय समुदाय आहे.
- भारत आणि युएई यांचे सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक असे बहुआयामी संबंध आहेत.
- यूएई इस्लामिक देश असला तरी आज पाकिस्तानपेक्षा भारताबरोबर त्यांचे संबंध बळकट आहेत.
- जम्मू-काश्मीर मुद्दावर जाहीरपणे यूएईने भारताचे समर्थन केले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणे हा भारताचा अंतर्गत विषय आहे अशी यूएईची भूमिका आहे.
- संयुक्त अरब अमिराती हा भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचादेखील एक भाग आहे.
- 2015 मध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी प्रथम युएईला भेट दिली होती. या दौर्याादरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापक रणनीतिक भागीदारीही झाली.
- 2017 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये 31 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली.
- 2017 मध्ये भारत-युएई व्यापार 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला.
- 2017 मध्ये प्रजासत्ताक दिन समारंभात अबू धाबीचा क्राउन प्रिन्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
- फेब्रुवारी 2018 मध्ये मोदींनी जागतिक सरकार समिटमध्ये मुख्य अतिथी म्हणून युएईला भेट दिली.
- पंतप्रधान मोदी पंतप्रधान म्हणून दोनदा युएईला गेले आहेत, तर शेख मोहम्मद बिन झायेद यांनीही तीन वर्षांत दोनदा भारत भेट दिली आहे.
स्त्रोत : THE HINDU,THE TIMES OF INDIA, THE NAVBHARAT TIMES,
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी