Search This Blog

Saturday, 24 August 2019

राजीव गौबा यांची कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (Appointments Committee of the Cabinet) राजीव गौबा यांना पुढील दोन वर्षांसाठी कॅबिनेट सचिव म्हणून नेमले आहे. त्यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 पासून सुरू होईल. 30 ऑगस्टपासून सचिवालयात विशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty)म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. ते प्रदीपकुमार सिन्हाची जागा घेतील. प्रदीप कुमार यांची नियुक्ती 2015 ला झाली होती त्यानंतर त्यांच्या 2 वर्षाच्या कार्यकालात वाढ करण्यात आली होती. 

राजीव गौबा
 • राजीव गौबा हे झारखंड केडरचे 1982 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
 • सध्या ते गृह मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत आहेत.
 • गौबा यांनी 31 ऑगस्ट 2017 रोजी गृहसचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
 • 60 वर्षीय गौबा यांनी केंद्रीय नगरविकास मंत्रालयातील सचिव, गृह मंत्रालयातील अतिरिक्त सचिव यांच्यासह अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
 • केंद्र आणि राज्य सरकार तसेचआंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये ,धोरणात्मक आखणी आणि कार्यक्रम अंमलबजावणीच्या क्षेत्रात ज्येष्ठ पदे भूषविली आहेत.
 • पंजाबमध्ये जन्मलेल्या गौबा यांनी पाटणा विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी घेतली.
 • ते 15 महिन्यांकरिता झारखंडचे मुख्य सचिव होते आणि नंतर 2016 मध्ये ते केंद्र सरकारच्या सेवेत परत आले.
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मंडळावर त्यांनी चार वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले.
 • गृहसचिव म्हणून त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षा, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य मधील बंडखोरी, मध्य व पूर्व भारतात नक्षलवादी समस्या हाताळण्याचा अनुभव आहे.
 • जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायद्याच्या मसुद्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
कॅबिनेट सचिव 
 • कॅबिनेट सचिव हे कॅबिनेट सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात.
 • हे पंतप्रधानांचे वरीष्ठ सल्लागार असतात तसेच मंत्रिमंडळाला सहकार्य करतात.
 • कॅबिनेट सचिव हे नागरी सेवा मंडळाचे अध्यक्ष असतात.
 • कॅबिनेट सचिव हे मुख्य सचिवांच्या बैठकीचे अध्यक्ष असतात
 • कॅबिनेट सचिव हे भारत सरकारमधील सर्वोच्च कार्यकारी अधिकारी आणि सर्वात वरिष्ठ नागरी सेवक आहेत.
 • भारताचा प्राधान्यक्रम (Indian order of precedence) मध्ये कॅबिनेट सचिवांचा 11 वा क्रमांक आहे.
 • स्वतंत्र भारताचे पहिले कॅबिनेट सचिव : एन. आर. पिल्लई,( 6 फेब्रुवारी 1950 ते 13 मे 1953)
 • सर्वात जास्त काळ सेवा देणारे कॅबिनेट सचिव : वाय.एन. सुकथणकर (14 मे 1953 ते 31 जुलै 1957)
स्रोत: द हिंदू, दै जागरण

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी