Search This Blog

Thursday, 15 August 2019

आरबीआय रेपो दर कपात

 • आरबीआयच्या सहा सदस्यीय मौद्रीक धोरण समितीने (MPC) बुधवारी रेपो दरात 0.35 टक्क्यांची कपात करून तो 5.40 टक्के केला तर रिव्हर्स रेपो दर 5.15 टक्के केला.
 • रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली मौद्रीक धोरण समितीने (MPC)हा निर्णय घेतला आहे.
 • यावर्षी रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये सुद्धा रेपो दरही कमी केला आहे. ही आरबीआयने केलेली सलग चौथी कपात आहे.
 • FY20 साठी GDP चा अंदाज सुद्धा दर्शवला आहे.2019-20 साठी GDP च्या वाढीच्या दराचा अंदाज 7% वरून 6.9% केला.
 • या आधी हा दर जून मध्ये 7.2% वरून 7% केला होता.
RBI चे नवे व्याजदर :
 • रेपो रेट : 5.40%
 • रिवर्स रेपो रेट : 5.15%
 • CRR : 4%
 • SLR : 19%
 • MSF : 5.65
 • Bank Rate : 5.65
रेपो दर (REPO RATE)
 • दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात.
 • बँकांकडून सरकारी रोखे खरेदी करुन निश्चित दराने विक्री करण्याच्या करारासह हे आरबीआय करत असते.
 • रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात. तसेच रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.
रिव्हर्स रेपो रेट
 • बरेचदा दिवसभर व्यवहार करूनही बँकांकडे मोठी रक्कम शिल्लक राहते. ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
 • हे रिझर्व्ह बॅंकेने भविष्यात बँकांना सरकारी बॉन्ड / सिक्युरिटीज परत विकत घेण्याच्या कराराने केलेले असते.
 • वास्तविक पाहता रिव्हर्स रेपो रेट हा बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो.
 • जेव्हा बाजारात जास्त तरलता असते तेव्हा रिझर्व्ह बँका रिव्हर्स रेपो रेट वाढते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वतःच्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.
CRR :
 • सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो.
 • रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला तिच्याकडे असलेल्या एकूण रकमेचा काही हिस्सा रिझर्व्ह बँकेकडे जमा करावा लागतो. या रकमेचं प्रमाण म्हणजेच सीआरआर होय.
MSF :
 • एमएसएफ म्हणजे मार्जिनल स्टॅडिंग फॅसिलिटी.
 • या सेवेअंतर्गत देशातल्या सर्व शेड्यूल कमर्शियल बँका एका रात्रीसाठी आपल्या एकूण ठेवींच्या १ टक्क्यापर्यंतच्या रकमेचं कर्ज रिझर्व्ह बँकेकडून घेऊ शकतात. बँकांना ही सुविधा शनिवार वगळता उर्वरित सर्व कामकाजांच्या दिवशी मिळते. या कर्जाचा व्याजदर रेपो रेटपेक्षा 1 टक्का जास्त असतो. हे कर्ज कमीत कमी 1 कोटींचं घ्यावं लागतं. त्यापेक्षा अधिक घ्यायचं असेल तर ते कोटीच्या पटीतच घ्यावं लागतं. यामुळे बँकांकडे रोख रक्कम उपलब्ध होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया :
 •  भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी RBI ची स्थापना झाली.
 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे.ही भारतातील सर्व बँकांचे संचालक आहे.
 • RBI ला बँकांची बँक सुद्धा म्हणतात.रिझर्व्ह बँक भारताच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते.

स्रोत : The Hindu, The Financial Express ,महाराष्ट्र टाईम्स.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी