Search This Blog

Monday, 5 August 2019

युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय : वर्षअखेर समीक्षा 2018

लोकसंख्येतील सर्वात चैतन्यदायी आणि धडाडीचा घटक असलेल्या युवकांना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवक कल्याण विभागाच्या राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून नवी उमेद दिली जात आहे. युवक कल्याण विभागाने हाती घेतलेल्या अनेक उपाययोजनांमुळे राष्ट्र निर्मितीत युवकांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढला आहे.

युवक कल्याण विभागाच्या योजनांची पुनर्रचना
विभागाच्या योजना एकत्र करुन त्यांची 1 एप्रिल 2016 पासून तीन योजनांमध्ये पुनर्रचना करण्यात आली आहे.

1)  राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम (आरवायएसके)
 • नेहरु युवा केंद्र संगठन (एनवायकेएस): 1.68 लाख युवा क्लब्सद्वारे 36.22 लाख युवकांनी नोंदणी असलेले एनवायकेएस युवकांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी आणि त्यांना राष्ट्र निर्मितीत सहभागी करुन घेण्यासाठी देशभरात काम करत आहे. यावर्षी एनवायकेएसचे महत्वपूर्ण कार्यक्रम/कामगिरी पुढीलप्रमाणे :-
 • 1764 व्यावसायिक आणि कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन, 51,508 युवकांचा सहभाग
 • 230 जिल्हा युवा परिषदांचे आयोजन, 1,84,5024 युवकांचा सहभाग
 • 21 जून 2018 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन देशात 38,356 ठिकाणी साजरा करण्यात आला ज्यात 23.68 लाख युवक सहभागी झाले होते.
 • स्वच्छता कार्यक्रम 1,15,437 ठिकाणी आयोजित करण्यात आला. 8577 शाळा/महाविद्यालये 7797 रुग्णालये आणि 21, 905 पुतळ्यांची स्वच्छता करण्यासाठी 12,07,686 युवक सहभागी झाले होते.
 • जल संवर्धन- 3.9 लाख युवकांच्या मदतीने 13757 जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 2430 नवीन जलाशय तयार करण्यात आले.
 • स्वच्छ गंगा- गंगा नदीकाठच्या गावांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी नेहरुन युवा केंद्र संगठन राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाबरोबर काम करत आहे.
 • एक भारत, श्रेष्ठ भारत- 15 जोड राज्यांमधे आंतर-राज्य युवा आदान-प्रदान कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
 • राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम- देशभरात पोषण अभियान कार्यक्रम राबवण्यासाठी नेहरु युवा केंद्र संगठन प्रमुख भागीदार आहे. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय आणि नेहरु युवा केंद्र संगठनच्या प्रयत्नांची उच्च स्तरावर प्रशंसा करण्यात आली. महिला आणि बाल कल्याण विभागाला उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवण्यात आले.
 • पराक्रम पर्व 2018- 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नेहरु युवा केंद्र संगठनने विविध कार्यक्रम आयोजित केले आणि सहभागही नोंदवला.
 • युवा आणि किशोरवयीन मुलांच्या विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम :- युवा आणि किशोरवयीन मुलांच्या विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम आणि युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या विविध योजनांचे विलीनीकरण करुन ‘राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम’ ही एक छत्री योजना तयार करण्यात आली. या अंतर्गत किशोरवयीन मुले आणि युवकांच्या विकासासाठी उपक्रम हाती घेण्यात सरकारी आणि बिगर-सरकारी संघटनांना मदत पुरवली जाते.
 • 2018-19 या आर्थिक वर्षात अखिल भारतीय स्तरावरील संघटनांसह पाच स्वयंसेवी संघटनांना आर्थिक मदत पुरवण्यात आली. 
 • मंदा तेनसिंग नॉर्वे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जमीन, पाणी, हवाई क्षेत्रातील साहसासाठी 10 विजेत्यांना देण्यात आले.
 • सहावा ईशान्य युवक महोत्सव त्रिपुरा येथे आयोजित करण्यात आला होता.
2)  राष्ट्रीय सेवा येाजना (एनएसएस)
 • या वर्षातील एनएसएसचे काही महत्वपूर्ण उपक्रम पुढीलप्रमाणे :-
 • केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून एनएसएसची पुनर्रचना
 • एनएसएस स्वयंसेवक सक्रियपणे देशभरातील स्वच्छ भारत उपक्रमांमध्ये सहभागी झाले.
 • आंतरराष्ट्रीय योग दिनी, 25.78 लाख स्वयंसेवक सहभागी झाले होते.
 • एनएसएसकडून देशभरात जीएसटी आणि डिजिटल पेमेंटबाबत जनजागृती करण्यात आली.

3) राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था
 • वर्षभरात 162 प्रशिक्षण/क्षमतानिर्मिती/कार्यशाळा, परिषद आणि अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात एनएसएस अधिकारी, एनवायकेएस अधिकारी, शिक्षक, केंद्र आणि राज्य सरकारच्या वाणिज्य विभागाचे अधिकारी यांच्यासह 6663 जण सहभागी झाले होते.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी