Search This Blog

Wednesday, 28 August 2019

UNCCD ची कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP 14) नवी दिल्ली येथे होणार

 • युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन (UNCCD) कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP 14) 2 ते 13 सप्टेंबर, 2019 दरम्यान भारतात प्रथमच ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात येणार आहे.
 • रिओ दि जानेरो (ब्राझील) नंतर असे प्रयत्न प्रथमच केले जात आहेत. पुढील दोन वर्षे भारत UNCCD चा अध्यक्ष असेल.
 • या कार्यक्रमात 200 हून अधिक देशांतील 3000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार असून सुमारे 100 देशांचे मंत्री  यात भाग घेतील. 
 • या परिषदेचा भर वाळवंटीकरण आणि नापीक जमीनीचे रूपांतर सुपीक जमिनीत करण्यावर असणार आहे.
 • केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मते, येत्या 10 वर्षात 50 लाख हेक्टर नापीक जमीन सुपीक होईल. यामुळे सुमारे 75 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल.
यूएनसीसीडी (युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन)
 • UNCCD ची स्थापना 1994 मध्ये झाली होती,तर 14 ऑक्टोबर 1994 रोजी या करारावर सह्या करण्यात आल्या. 
 • शाश्वत जमीन व्यवस्थापनासाठी पर्यावरण आणि विकासाला जोडणारा हा एकमेव कायदेशीर बंधनकारक करार आहे.
 • यात एकूण 197 सभासद आहेत.
 • अधिवेशनाचे सर्व 197 सभासद कोरडवाहू भागातील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी, जमीन व माती उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी व दुष्काळाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी एकत्र काम करतात.
 • COP (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज) 2001 पासून दर दोन वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाते.त्यापूर्वी ही वार्षिक परिषद होती
 • पहिले सीओपी 1997 मध्ये इटलीच्या रोम येथे आयोजित करण्यात आले होते.
 • या आधी COP13 सत्र 2017 मध्ये ऑर्डोस (चीन) येथे झाले.
स्रोत: लोकसत्ता,The Hindu. www.unccd.int/conventionconference-parties-cop/cop14-2-13-september-new-delhi-india

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी