Search This Blog

Wednesday, 7 August 2019

डेल स्टेन : कसोटी क्रिकेटमधून निवृत्त


दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे असे असले तरी तो वनडे आणि टी -२० सामने खेळत राहणार आहे. त्याने आपल्या 14 वर्षाच्या करिअर मध्ये 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 बळी घेतले आहेत.

डेल स्टेन
कसोटी क्रिकेट कारकीर्द :
  • पदार्पण : 13 डिसेंबर 2004 (पोर्ट एलिजाबेथ, इंग्लंडविरुद्ध)
  • 93 सामन्यात 439 विकेट
  • सरासरी : 22.95
  • शेवटचा सामना - फेब्रुवारी 2019 (श्रीलंका विरुद्ध)
  • 26 वेळा 5 पेक्षा जास्त विकेट तर 5 वेळ 10 पेक्षा जास्त विकेट

एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द :
  • पदार्पण - 17 ऑगस्ट 2005
  • 125 सामन्यांत 196 बळी

टी -20क्रिकेट कारकीर्द :
  • पदार्पण - 23 नोव्हेंबर 2007
  • 44 आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यांत 61 बळी


त्याला ICC 2008 टेस्ट क्रिकेटर ऑफ़ द ईयर अवार्ड मिळाला. गेल्या काही दिवसांपासून दुखापती ने त्रस्त होता. या कारणांमुळे 2019 च्या वर्ल्डकप मध्ये खेळता आले नाही. 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर बंगलोर कडून फक्त 2 मॅच खेळला.

स्रोत:  THE HINDU, लोकसत्ता, दैनिक भास्कर, आज तक.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी