Search This Blog

Monday, 5 August 2019

विनेश फोगटला सलग तिसरे सुवर्ण

 • २४ वर्षीय विनेशने अंतिम सामन्यात पोलंडच्या रुक्सानाचा ३-२ असा पराभव केला.
 • भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने वॉरसॉ येथे झालेली पोलंड खुली कुस्ती स्पर्धा जिंकून महिलांच्या ५३ किलो गटामधील सलग तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली.
 • उपांत्यपूर्व सामन्यात विनेशने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सोफिया मॅट्सनचा (स्वीडन) पराभव केला.
 • गेल्या महिन्यात विनेशने स्पेनमधील ग्रां. प्रि. कुस्ती स्पर्धा आणि टर्की येथील यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.

विनेश फोगट
 • जन्म : 25 ऑगस्ट 1994
 • गीता फोगाट,बबिता कुमारी,रितू फोगाट यांची चुलत बहीण.
 • कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांचे लहान बंधू राजपाल यांची कन्या.
 • 2016 ला अर्जुन अवॉर्ड.
 • Laurence world sports award 2019 साठी नामांकित होणारी पहिली खेळाडू.
 • ('' वर्षातील पुनरागमन '' साठी नामांकित)
 • राष्ट्रकुल स्पर्धा- 2018 मध्ये सुवर्ण तसेच आशियाई स्पर्धा-2018 मध्ये सुद्धा सुवर्ण, असा पराक्रम करणारी ती पहिलीच.
2019 मध्ये :
 • आशियाई कुस्ती स्पर्धा :: ब्रॉंझ .
 • स्पेनमधील ग्रां. प्रि. कुस्ती स्पर्धा :: सुवर्ण
 • यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धा :: सुवर्ण
 • पोलंड खुली कुस्ती स्पर्धा :: सुवर्ण

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी