अॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. या आगीमुळे सर्वाधिक नुकसान ब्राझीलमध्ये झाले असून तेथील 2 हजार 700 किमीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे.जगाचं फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगलांना लागलेली आग इतकी भीषण आहे की वणव्यामधून निघणारा धूर अंतराळातूनही दिसत आहे. ब्राझीलमधील अंतराळ संशोधन संस्था, आयएनपीईच्या आकडेनुसार ब्राझीलमध्ये वर्षभरात 74,155 आगीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक घटना ब्राझीलच्या हद्दीत असणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगली प्रदेशात घडल्या आहेत. या वर्षी अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 83 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अॅमेझॉन वर्षावने
- अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय पर्जन्यवन म्हणजेच नैसर्गिक रेन फॉरेस्ट आहे.या वनांना जगाचं फुफ्फुस या नावाने ओळखलं जातं.या जंगलांमध्ये वर्षातील 12 महिने पाऊस पडतो. ही जंगले इतकी घनदाट आहेत की येथे अनेक ठिकाणी सूर्यकिरणे जमीनीपर्यंत पोहचत नाहीत.
- जगभरातील एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन या वनांच्या माध्यमातून तयार होतो. पृथ्वीचे 20% शुद्ध पाणी देखील येथे उपस्थित आहे.
- सर्वात मोठं पर्जन्यवन असणारे अॅमेझॉनचे जंगलाचे एकूण क्षेत्रफळ 55 लाख चौरस फूट इतकं आहे.मागील 50 वर्षात या जंगलातील 20% जंगल नष्ट झाले आहे.
- दक्षिण अमेरिकेतील 9 देशांमध्ये हे वनक्षेत्र पसरलेले आहे. अॅमेझॉन पर्जन्यवनाचा सर्वाधिक भाग (60 टक्के) हा ब्राझीलच्या भूप्रदेशावर आहे. त्याचबरोबरच हे अॅमेझॉनचे जंगल कोलंबिया, व्हेनेझुएला, बोलिविया, फ्रेंच गयाना, पेरु, गयाना, सुरीनेम, आणि एक्वॅडोर या देशांमध्येही आहे.
- अॅमेझॉन जंगल ब्राझीलमध्ये आहे.
- या जंगलांचा आकारामुळे त्यांची एक स्वतंत्र परिसंस्था अस्तित्वात असून पृथ्वीवरील ऑक्सिजन आणि इतर महत्वाच्या नैसर्गिक घटकांचा समतोल राखण्यासाठी हे वनक्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे.हे महाकाय जनगल कार्बन सिंक म्हणून कार्य करते.हे जंगल ग्लोबल वार्मिंगचा दर कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते
- अॅमेझॉन पर्जन्यवनांमध्ये वनस्पतींच्या 40 हजारहून अधिक जाती आहेत. यामागील अनेक वृक्ष ही काही शे वर्ष जुनी आहेत.
- या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणीसंपत्तीही आहे. पक्षांच्या 1 हजार 300 हून अधिक प्रजाती येथे असून त्यापैकी काही अत्यंत दूर्मिळ आहेत.
- अॅमेझॉन नदीच्या आजूबाजूला पसरलेल्या या जंगलांमध्ये चक्क तीन हजारहून अधिक प्रकारचे प्रकारचे मासे आणि चारशेहून अधिक सस्तन प्राणी अढळून येतात.
- अॅमेझॉनचे पर्जन्यवनामध्ये तब्बल 25 लाखांहून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या किटकांचे वास्तव्य आहे.
- या जगलांमध्ये किटकांबरोबरच हजारो विषारी साप अढळतात. जगातील सर्वात मोठे आणि सर्वात विषारी साप या प्रदेशात आहेत.
- वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रजातीचे विषारी बेडूक, विजेचा झटका देणारे इलेक्ट्रिक इल्स, भयंकर असे फ्लेश इटिंग पिरान्हा मासे, मांसाहार करणारे जॅग्वार असे अनेक वैविध्यपूर्ण पण हिंस्र प्राणीही या जंगलांमध्ये अढळतात.
स्रोत: द हिंदू,लोकसत्ता,लोकमत,महाराष्ट्र टाईम्स.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी