Search This Blog

Monday, 19 August 2019

चार नवीन उत्पादनांना मिळाला जीआय टॅग

उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने अलीकडेच 4 नवीन भौगोलिक निर्देशक (जीआय) नोंदणी केली आहे.
तामिळनाडू राज्यातील दिंडीगुल जिल्ह्यातील पलानी शहरातील पलानीपंचामिर्थम, मिझोरम राज्यातील तल्लोहपुआन आणि मिझोपुआन्ची आणि केरळमधील तिरुर ची पाने यांचा समावेश नोंदणीकृत जीआयच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.जीआय टॅग किंवा ओळख केवळ अशा विशिष्ट उत्पादनांना दिली जाते जी केवळ विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात आढळतात आणि त्यामध्ये स्थानिक वैशिष्ट्ये अंतःस्थापित असतात. अर्थातच, जीआय टॅगसह उत्पादन खरेदी करताना, ग्राहकांना त्याचे तपशील आणि गुणवत्ता याबद्दल आश्वासन दिले जाते.

पलानीपंचामिर्थम
 • तामिळनाडूच्या दिंडीगुळ जिल्ह्यातील पलानी शहरातील पालानी टेकड्यांमध्ये असलेल्या अरुल्मिगु धान्‍दयुथापनी स्वामी मंदिराच्या प्रतिष्ठित दैवत भगवान धान्‍दयुथापनी स्वामीच्या अभिषेकाशी संबंधित प्रसादाला पलानीपंचमर्थम असे म्हणतात.
 • हा प्रसाद केळे, गूळ-साखर, गायीचे तूप, मध आणि वेलची यासारख्या पाच नैसर्गिक पदार्थांना मिसळून तयार केला जातो.
 • पहिल्यांदाच तामिळनाडूमधील एका मंदिराच्या प्रसादाला जीआय टॅग देण्यात आला आहे.
तवलोहपुआन
 • तवलोहपुआन मिजोरम चे एक जड, अत्यंत मजबूत आणि उत्कृष्ट वस्त्र आहे जे विणकाम आणि गुंतागुंतीच्या डिझाइनसाठी ओळखले जाते.
 • मिझो भाषेत तावलोह म्हणजे एक भक्कम गोष्ट जी मागे खेचली जाऊ शकत नाही.
 • मिझो समाजात तवलोहपुआन ला विशेष महत्त्व आहे आणि ते संपूर्ण मिझोरम राज्यात निर्माण होते. 
 • आयझॉल आणि थेंझॉल शहरे ही त्याच्या उत्पादनाची मुख्य केंद्रे आहेत.
मिजोपुआनचेई
 • मिजोपुआनचेई हे मिजोरम चे एक रंगीबेरंगी वस्त्र आहे जे मिझो कपड्यांमध्ये सर्वात रंगीबेरंगी मानले जाते.
 • हे मिझोरममधील प्रत्येक महिलेसाठी एक अत्यावश्यक वस्त्र आहे 
 • या राज्यात लग्न करण्याचा एक अतिशय महत्वाचा पोशाख आहे. 
 • हा ड्रेस सहसा मिझोरमच्या उत्सवात नृत्य आणि औपचारिक समारंभात वापरला जातो.

तिरुर ची पाने
 • केरळमधील तिरुर च्या पानांची लागवड प्रामुख्याने तिरुर, तनुर, तिरुरांगडी, कुट्टीपुरम, मलप्पुरम आणि मलप्पुरम  जिल्यातील वेंगारा ब्लॉकमध्ये  केली जाते. 
 • ही पाने चविष्ट आणि औषधी गुणधर्म युक्त असतात.
 • ही पाने सामान्यत: पान मसाला बनवण्यासाठी वापरली जातात.तसेच यांचा औषधी, सांस्कृतिक आणि औद्योगिक उपयोग ही बरेच आहेत.

जीआय टॅग केलेल्या उत्पादनांचा दुर्गम भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा होतो, कारण यामुळे कारागीर, शेतकरी, कारागीर आणि विणकरांचे उत्पन्न वाढते.

अत्यंत महत्वाचे
कोल्हापूरी चप्पल
 • जून 2019 मध्ये कोल्हापूरी चप्पल ला GI टॅग मिळाला.
 • पेटेंट, डिजाइन आणि ट्रेड मार्क चे महासंचालक यांनी महाराष्ट्र आणि  कर्नाटक च्या काही खास भागातील कोल्हापुरी साठी GI टॅग ची परवानगी दिली.
 • महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील  4-4 जिल्ह्यांना कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी प्राधान्य क्षेत्राच्या रुपात निवडले. म्हणजे फक्त या 8 जिल्ह्यात निर्मिती केलेल्या चपलांनाच GI टॅग मिळेल.
 • कोल्हापुरी चप्पल ला GI टॅग मिळालेले जिल्हे 
महाराष्ट्र : 1)कोल्हापुर, 2)सोलापुर, 3)सांगली आणि 4)सातारा .
कर्नाटक : 1)धारवाड़, 2)बेळगाव, 3)बागलकोट आणि 4)बीजापुर.

ओडिशा रसगोला
 • नुकताच जुलै 2019 मध्ये ओडिशातील रसगुल्ल्यांना भौगोलिक संकेतांक (जीओग्राफिकल इंडिकेशन टॅग) मिळाला आहे. 
 • चेन्नई येथील भौगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयाने 'ओडिशा रसगुल्ला'ला प्रमाणपत्र दिले.
 • या प्रमाणपत्राची वैधता २२ फेब्रुवारी २०२८ पर्यंत असणार आहे.
 • 2015 सालापासून ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 'रसगुल्ला' या मिठाईच्या भौगोलिक हक्कावरून वाद सुरू आहे. 
 • पश्चिम बंगालमधील रसगुल्ल्याला 2017 मध्ये जीआय टॅग मिळाला. 
 • ओडिशा लघुउद्योग निगम लिमिटेडने मिठाई दुकानदारांच्या समितीच्या साह्याने चेन्नई येथील जीआय कार्यालयाकडे रितसर अर्ज केला होता.
 • ओडिशात रसगुल्ला दिन साजरा होतो. जगन्नाथ यात्रेदरम्यान रसगुल्ला प्रसाद म्हणून दिला जातो.
स्रोत: PIB,द हिंदू,द इकॉनॉमिक टाइम्स,लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी