Search This Blog

Wednesday, 28 August 2019

फ्रान्समध्ये 45 वी G-7 शिखर परिषद

 • 24-26 ऑगस्ट 2019 दरम्यान फ्रान्समधील बेरिट्झ (Biarritz) येथे 45 वी G-7 शिखर परिषद झाली. या शिखर परिषदेची थीम होती "लढाई असमानतेशी" (fighting inequality). 
 • या परिषदेत जी 7 सदस्य देश (फ्रान्स, इटली, कॅनडा, यूएसए, जपान, जर्मनी आणि युनायटेड किंगडम) सहभागी झाले होते.
 • या परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाग घेतला होता, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे खास पाहुणे म्हणून मोदींना या शिखर परिषदेत उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले होते.
 • यापूर्वी 2005 मध्येही भारत जी-7 शिखर परिषदेत सामील झाला होता.
G-7 किंवा 'ग्रुप ऑफ सेव्हन'
 • ही एक आंतरशासकीय संस्था आहे जी 1975 मध्ये तत्कालीन सर्वोच्च अर्थव्यवस्थांनी जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अनौपचारिक मंच म्हणून स्थापना केली होती.
 • G-7 मध्ये खलील देशांचा समावेशआहे.
 1. अमेरिका
 2. ब्रिटन
 3. फ्रान्स
 4. इटली
 5. कॅनडा
 6. जपान 
 7. जर्मनी 
 • आयएमएफच्या मते या जगातील सर्वात प्रगत अर्थव्यवस्था आहेत. त्या जागतिक निव्वळ संपत्तीपैकी 58% संपत्तीचे प्रतिनिधित्व करतात. 
 • तसेच जागतिक जीडीपीच्या 46% प्रतिनिधित्व करतात.
 • 1976 मध्ये कॅनडा या समूहामध्ये सामील झाला तर युरोपियन युनियनने 1977 पासून उपस्थितीला सुरुवात केली.
 • 1997 मध्ये रशिया सामील झाल्यानंतर G-7 हा ‘G8’ म्हणून ओळखला जात असे. युक्रेनच्या क्रिमियाच्या वादावरून रशियाचे 2014 मध्ये सदस्यत्व रद्द केले, नंतर हा गट पुन्हा G-7 म्हणून ओळखला जाऊ लागला.
 • G-7 देश वार्षिक शिखर परिषदेचे अध्यक्षपद चक्रीय पद्धतीने ठरवतात. 44 वी परिषद 2018 ला कॅनडा मध्ये झाली होती, तर पुढील परिषद 2020 मध्ये अमेरिकेत आयोजित केली जाणार आहे. यजमान देशाला G-7 बाहेरील देशांना परिषदेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करावे लागते.
 • G-7 ला कुठलीही औपचारिक घटना नाही तसेच  निश्चित मुख्यालय सुद्धा नाही.तसेच वार्षिक परिषदेमध्ये नेत्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा बंधनकारक नसतात.
 • “शेर्पा”
 • “शेर्पा”हे सामान्यत: वैयक्तिक प्रतिनिधी किंवा राजदूतासारखे मुत्सद्दी कर्मचारी असतात जे या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करतात.ते शिखर परिषदेच्या तयारीमध्ये मदत करतात.
 • सध्याच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचे शेर्पा हे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आहेत.
G-7 आणि G-20
 • जी -20 हा देशांचा एक मोठा गट आहे, ज्यामध्ये जी 7 सदस्य देखील आहेत. जी -20 ची स्थापना  1999 मध्ये करण्यात आली होती. जागतिक आर्थिक चिंतेचे निराकरण करण्यासाठी अधिकाधिक देश आणण्याची गरज निर्माण झाली होती.
 • G--7 देशांव्यतिरिक्त, G-20 मध्ये अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि तुर्की यांचा समावेश आहे.
 • एकत्रितपणे G-20 देश जगातील सुमारे 80% अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात.
 • G-7 विस्तृत मुद्द्यांविषयी चर्चा करतात, तर G-20 मधील चर्चा जागतिक अर्थव्यवस्था आणि वित्तीय बाजाराशी संबंधित असते.
 • 2022 मध्ये भारत G -20 शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.
स्रोत: लोकसत्ता,महाराष्ट्र टाईम्स,The Hindu,The Indian Express

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी