- राज्य निवडणूक आयोगातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या लोकशाही पुरस्कारांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मुंबईत केली. सन 2016 आणि 2017 या कालावधीत पार पडलेल्या नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. वेगवेगळ्या सहा गटात एकूण 14 पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
- राज्यघटनेच्या 73 आणि 74 व्या दुरुस्तीनंतर 1994 साली राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. या आयोगांकडे स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी असते. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 25 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत 2017 ते 19 या काळात एक विशेष सर्वेक्षण करण्यात आले.
- या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना संबंधितांकडून विशेष महत्व दिले जात नाही असे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर देशाची लोकशाही बळकट करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्व मिळावे या दृष्टीने या संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना लोकशाही पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला. त्यानुसार पहिल्या लोकशाही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
[Source: PIB Gov of India ]
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी