Search This Blog

Wednesday, 7 August 2019

डीआरडीओ ची QRSAM चाचणी यशस्वी

  • नुकतीच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने DRDO सर्व हवामानांत व प्रदेशांत अनुकूल अशा अत्याधुनिक क्यूआरएसएएम (क्विक रिएक्शन सर्फेस-टू-एअर मिसाईल) ची यशस्वी चाचणी घेतली.
  • ओदिशातील चंडीपूर येथे एकात्मिक चाचणी क्षेत्रात सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीत हवाई लक्ष्य ठेवले होते.
QRSAM (Quick Reaction Surface-to-Air Missile)
  • हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) भारतीय सैन्यासाठी विकसित केले आहे.
  • डीआरडीओ ने या मिसाइल ची निर्मिती भारत इलेक्ट्रनिक्स लिमिटेड च्या मदतीने केली आहे.
  • हे क्षेपणास्त्र फारच कमी वेळात शत्रूंच्या लक्ष्यांवर नजर ठेवू शकते.
  • इंधन प्रकार : घन इंधन
  • रेंज : 25-30 किमी
  • हे क्षेपणास्त्र एका ट्रकवर तैनात केले जाऊ शकते.
  •  हे क्षेपणास्त्र वेगवेगळ्या अंतरावर आणि उंचीवर असलेले आपले लक्ष्य नष्ट करू शकते.
  • क्यूआरएसएएमची प्रथम चाचणी 4 जुलै 2017 रोजी घेण्यात आली, नंतर 26 फेब्रुवारी 2019 रोजी या क्षेपणास्त्राच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या.
स्रोत: THE HINDU ,THE TIMES OF INDIA, लोकसत्ता.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी