Search This Blog

Friday, 2 August 2019

भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे रचनाकार पिंगली वेंकय्या यांची आज 142 वी जयंती

 • स्वातंत्र्यसैनिक आणि भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे रचनाकार पिंगाली व्यंकय्या यांची जयंती 2 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते.
 • पिंगाली व्यंकय्या यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात भतलामपेनूमारू येथे 2 ऑगस्ट 1876 रोजी झाला.
 • त्यांचा गांधीवादी सिद्धांतावर विश्वास होता. ते भाषातज्ज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ आणि लेखक देखील होते. 
 • वयाच्या 19 व्या वर्षीच ते ब्रिटीश लष्करात भरती झाले. ते दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो बोएर युद्धामध्ये सैनिक म्हणून ब्रिटिशांच्या बाजूने लढले. या दरम्यान त्यांनी गांधीजींची भेट घेतली. त्यावेळी पिंगली व्यंकय्या 19 वर्षांचे होते.
 • आफ्रिकेहून परत आल्यानंतर पिंगली व्यंकय्या यांनी बहुतांश वेळ शेती व कापूस संशोधनात घालवला. लाहोरच्या अँग्लो-वैदिक शाळेत संस्कृत, उर्दू आणि जपानी भाषा शिकली.
 • पिंगली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते. ते हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळेच त्यांना डायमंड वेंकैया हे टोपणनाव देण्यात आले होते.त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने त्यांना कॉटन वेंकैया नावानेही ओळखले जायचे
ध्वज डिझाइन
 • पिंगली व्यंकय्या यांनी 1916 मध्ये एक पुस्तक प्रकाशित केले होते, ज्यात त्यांनी ध्वजाचे 30  डिझाईन्स सादर केल्या. 
 • विजयवाडा येथे गांधीजींच्या भेटी दरम्यान त्यांनी गांधीजींना झेंड्याचे डिझाईन दाखवले.गांधीजींनी व्यंकियांना नवीन डिझाइन तयार करण्यास सांगितले. 
 • 31 मार्च 1921 मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला. 
 • मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चर्खा असावा असे सांगत चर्ख्यासहीत हा झेंडा सादर केला तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला. 
 • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने या झेंड्याला 1931 मध्ये मान्यता दिली
 • 4 जुलै 1963 ला पिंगली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी 2009 साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. 
 • 2011 साली भारतरत्न पुरस्कारासाठी (मरणोत्तर) पिंगली यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
वर्तमान ध्वज 
 • भारताचा राष्ट्रीय ध्वज पिंगाली व्यंकय्याने डिझाइन केलेल्या ध्वजावर आधारित आहे.
 • हा ध्वज भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा स्वराज ध्वज म्हणून डिझाइन केला होता. 
 • 22 जुलै, 1947 रोजी संविधान सभांनी हा ध्वज स्वीकारला होता.
Source : The Hindu , Indian Express, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी