Search This Blog

Wednesday, 28 August 2019

पहिल्या पोलीस महासंचालक कांचन चौधरी यांचे निधन

  • देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DGP) कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे मुंबईत 26 ऑगस्ट 2019 रोजी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.
  • चौधरी या 1973 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी  होत्या. त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशात झाला. 2004 ते 2007 या काळात त्या उत्तराखंड पोलिस दलात महासंचालक पदावर होत्या.  
  • 33 वर्षांच्या सेवेनंतर 2007 मध्ये त्या निवृत्त झाल्या.1997 मध्ये त्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक मिळाले.उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना राजीव गांधी पुरस्कारही मिळाला होता.
  • किरण बेदी यांच्यानंतर देशातील त्या दुसऱ्या महिला आयपीएस अधिकारी होत्या.
  • भट्टाचार्य यांनी देशातील पहिल्या पोलीस महासंचालक होण्याचा मान 2004 मध्ये पटकावला होता. त्यावेळी त्या उत्तराखंड पोलीस दलाच्या प्रमुख होत्या. त्यांनी CISF मध्ये सुद्धा काम केले.
  • त्यांनी हरिद्वार येथून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्या जिंकू शकल्या नाही.
  • त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन, दूरदर्शनने 80 च्या दशकात उडान नावाची लोकप्रिय टीव्ही मालिका सुरू केली.कांचन यांनीही त्यात पाहुण्या कलाकार म्हणून काम केले होते.या मालिकेत त्यांच्या IPS बनण्याचा संघर्ष दाखवला आहे.


स्रोत: लोकसत्ता,The Times Of India.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी