
भारत आणि बहारिन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहारिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महत्वाचे मुद्दे :
- नरेंद्र मोदी हे बहारिनला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.
- भारतीय वंशाचे लोक हे बहरैनमधील सर्वात जास्त संख्येतील परदेशी नागरिक आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहारिन भेटीनिमित्त, तेथे विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या २५० भारतीय कैद्यांना मानवतावादी तत्त्वावर माफी दिली आहे.
- अधिकृत माहितीनुसार परदेशांतील तुरुंगात सध्या एकूण ८१८९ भारतीय व्यक्ती शिक्षा भोगत असून त्यात सौदी अरेबियातील भारतीय कैद्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे १८११, तर संयुक्त अरब अमिरातीत १३९२ आहे. बहारिनमध्ये एकूण किती भारतीय लोक तुरुंगात आहेत हे समजलेले नाही.
- अलिकडच्या काळात अनेक इस्लामिक राष्ट्रांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या उच्च नागरी पुरस्काराने गौरविले.
- 'किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ बहरीन - ऑगस्ट 2019
- 'ऑर्डर ऑफ झायद' युएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार - ऑगस्ट 2019
- 'रुल ऑफ निशान इज्जुद्दिन', मालदीव - जून 2019
- ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' - फेब्रुवारी 2018
- 'अमीर अमानुल्ला खान अवॉर्ड', अफगाणिस्तान - जून 2016
- 'किंग अब्दुलाझिझ सश अवॉर्ड', सौदी अरेबिया - एप्रिल 2016
स्रोत: PIB, The Hindu, लोकसत्ता
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी