Search This Blog

Monday, 19 August 2019

राज्यसभेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (NID) (दुरुस्ती) विधेयक, 2019 मंजूर केले.

  • राज्यसभेने नुकतेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (दुरुस्ती) विधेयक, 2019 मंजूर केले.
  • या द्वारे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कायदा 2014 मध्ये सुधारणा करण्यात येईल.
  • या विधेयकाद्वारे अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनला राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून घोषित केली आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (दुरुस्ती) बिल, 2019 
  • या विधेयकाद्वारे खालील चार राष्ट्रीय रचना संस्था राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून घोषित केल्या जातील.
1) आंध्र प्रदेश (अमरावती)
2) आसाम (जोरहाट)
3) मध्य प्रदेश (भोपाळ) आणि
4) हरियाणा (कुरुक्षेत्र) 
  • सध्या या संस्था सोसायटी नोंदणी अधिनियम, 1960 अन्वये नोंदणीकृत आहेत.
  • सध्या या संस्थां डिप्लोमा किंवा डिग्री प्रदान करू शकत नाही. 
  • या संस्था राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था घोषित झाल्यावर पदवी आणि पदविका प्रदान करण्यास सक्षम होतील.
  • शिवाय, यामुळे त्यांना सामाजिकदृष्ट्या समावेशक बनण्यास आणि शेती, आरोग्य सेवा आणि वाहतुकीसह विविध क्षेत्रात डिझाइनच्या गरजा भागविण्यास मदत होईल.
  • केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री :  पीयूष गोयल 
स्रोत : The Economic Times, The Indian Express.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी