
पार्श्वभूमी
- 6 ऑगस्ट, 2019 रोजी भारत सरकारने कलम 370 आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला.
- केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात विभागले.
- जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेचा अनुच्छेद 370 सरकारने रद्द केला असल्याचे अमित शाह यांनी राज्यसभेत जाहीर केले.
- विधानसभेविना लडाख प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश (यूटी) असेल आणि, जम्मू-काश्मीर हा एक विधीमंडळ असलेला केंद्र शासित प्रदेश असेल.
कलम 370 बद्दल
- अनुच्छेद 370 जम्मू आणि काश्मीर राज्याला एक विशेष दर्जा प्रदान करीत होता.
- जेव्हा कलम 370 राज्यात सक्रिय होते तेव्हा राज्यात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण वगळता इतर सर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागत असे.
- आता कलम 370 मधील कलम 1 वगळता कलम 370 मधील सर्व तरतुदी निरर्थक आहेत.
- जम्मू-काश्मीरच्या जागा कमी होऊन 83 होतील कारण लडाख प्रदेशातील चार जागा कमी केल्या जातील.
स्रोत PTI,THe Hindu,Times of India.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी