Search This Blog

Saturday, 3 August 2019

चांद्रयान -२ चा आणखी एक टप्पा सर; पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश

  • भारतासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या चांद्रयान मोहिमेतील आज आणखी एक टप्पा पार केला असून, चांद्रयान २ ने पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही माहिती दिली.
  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवून तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी चांद्र मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी या यानाने पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला.
  • पुढचा कक्षा बदल ६ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. यापूर्वी २४ आणि २६ जुलै रोजी चांद्रयान २ ने पृथ्वीच्या पहिल्या आणि दुसऱ्या कक्षा बदलाचा टप्पा पार केला होता.
  • १४ ऑगस्ट रोजी चांद्रयान २ पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे, असे इस्रोकडून सांगण्यात आले.
  • प्रोपेलिंग यंत्रणेचा वापर करून चंद्राच्या पहिल्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी चांद्रयान २ ची गती कमी करण्यात येईल. ३ सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील.
  • ७ सप्टेंबर रोजी लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही इस्रोकडून सांगण्यात आले.


स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी