Search This Blog

Monday, 5 August 2019

ईबोलावरील नव्या लसीची चाचणी सुरू  • ईबोला विषाणूवरील प्रायोगिक लसीची सर्वात मोठी चाचणी सुरू केली आहे.
  • युगांडामधील संशोधकांनी ईबोला विषाणूवरील प्रायोगिक लसीची सर्वात मोठी चाचणी सुरू केली आहे.
  • नजीकच्या काँगोमध्ये ईबोलाच्या उद्रेकामुळे १८०० हून अधिक लोकांचा मृत्यू ओढवला असून तेथे ही लस वापरली जाण्याची अपेक्षा आहे.
  • जान्सन फार्मास्युटिकल्सच्या या लसीच्या चाचणीत पश्चिमेकडील म्बारारा जिल्ह्यातील ८०० लोकांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
  • जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी या चाचणीला पाठिंबा दिला आहे. यात लंडन स्कूल ऑफ हायजिन अ‍ॅन्ड ट्रोपिकल मेडिसिनचाही समावेश आहे.
  • ईबोलावरील लसीच्या या चाचणीचे नेतृत्व युगांडामधील संशोधक पोन्टिआनो कालीबू हे करीत आहेत.
  • काँगोमध्ये गेल्या वर्षभरापासून ईबोला विषाणूचा कहर सुरू आहे. तेथील एक लाख ८० हजारांहून अधिक लोकांना प्रायोगिक तत्त्वावरील, तरीही परिणामकारक ठरलेली मर्क लस देण्यात आली आहे. परंतु, आता ईबोला विषाणूचा प्रसार हा काँगोमधील प्रमुख शहरे, गोमा तसेच रवांडा सीमेवरही झाला असल्याने या लसीची मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल की नाही, अशी चिंता आरोग्य तज्ज्ञांना भेडसावत आहे.
  • जान्सन लसीची चाचणी आतापर्यंत सहा हजार लोकांवर करण्यात आली आहे. यात बहुसंख्य आफ्रिकेतील आहेत. प्राण्यांबरोबरच मानवामधील चाचण्यांतही या लसीचे आशादायक परिणाम दिसल्याचे काबीबू यांनी सांगितले.
  • नवी चाचणी दोन वर्षांपर्यंत चालणे अपेक्षित आहे. या लसीमुळे ईबोलापासून किती दिवस संरक्षण मिळते याची यात तपासणी केली जात आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी