Search This Blog

Friday, 2 August 2019

मोटर वाहन दुरुस्ती विधेयक आज प्रदीर्घ चर्चेनंतर राज्यसभेत मंजूर


 • मोटर वाहन दुरुस्ती विधेयक  राज्यसभेत मंजूर करण्यात आलं आहे. विधेयकात रस्ते अपघात रोखण्यावर भर.
 • दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यास दोन हजारांऐवजी आता दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
 • हिट अँड रन केसमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई देण्यात येणार आहे.
 • वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड आकारण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.
 • केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडले.
 • १०८ विरुद्ध १३ मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आलं.
 • या विधेयकात वाहतुकीचे नियम मोडल्यास अधिक दंड आकारण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी हिट अँड रन केसमध्ये मृत व्यक्तिच्या कुटुंबीयांना केवळ २५ हजाराची भरपाई मिळायची. आता ही रक्कम वाढवून दोन लाख करण्यात आली आहे.
हेल्मेट नसल्यास हजार रुपये दंड
आतापर्यंत हेल्मेट न वापरणाऱ्यांना १०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता हेल्मेट न वापरणाऱ्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय वाहनचालकाचं लायसन्स तीन महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार आहे.

परवान्याशिवाय गाडी चालवल्यास ५ हजार दंड :
आतापर्यंत परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यास कलम १८१ अन्वये ५०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता दंडाची रक्कम ५ हजार करण्यात आली आहे.

गाडी चालवताना फोनवर बोलल्यास ५ हजार दंड :
गाडी चालवताना मोबाईलवर संभाषण केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येत होता, आता ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

महत्त्वाचे :
 • सीट बेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. आधी ही रक्कम शंभर रुपये होती.
 • बसमधून विना तिकिट प्रवास केल्यास दोनशे रुपयांऐवजी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
 • अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास गाडीच्या मालकाला दोषी मानलं जाणार आहे. याप्रकरणी वाहनाच्या मालकाला २५ हजार रुपये दंड आणि ३ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
 • रुग्णवाहिकांना जाण्यासाठी प्राधान्य देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. रुग्णवाहिकेचा रस्ता अडवल्यास दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी