- 17 ते 25ऑगस्ट 2019 दरम्यान लेह-लडाखमध्ये आदि महोत्सव आयोजित केला जाणार आहे.
- आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार आणि आदिवासी सहकारी विपणन विकास संघ (ट्राईफेड) यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.
- लेह-लडाखच्या पोलो मैदानात होणार्या नऊ दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन उद्या संध्याकाळी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल श्री सत्यपाल मलिक यांच्या हस्ते होणार.
- 'आदिवासी कला, संस्कृती आणि वाणिज्य च्या भावनेचा उत्सव' ही या महोत्सवाची थीम आहे. यात ट्रायफिड 'सेवा प्रदाता' आणि 'मार्केट डेव्हलपर' ची भूमिका साकारेल.
- देशभरातील 20 हून अधिक राज्यांमधील सुमारे 160 आदिवासी कारागीर या महोत्सवात सक्रिय सहभाग घेतील आणि त्यांची उत्कृष्ट कारीगरी दर्शवितील.
- या काळात प्रदर्शित उत्पादनांमध्ये राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालमधील आदिवासी वस्त्रे, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि ईशान्येकडील आदिवासी दागिने, मध्य प्रदेशातील गोंड चित्रकला, महाराष्ट्रातील वारली कला, छत्तीसगडमधील धातू हस्तकला, मणिपूर ची काळ्या मातीची भांडी यांचा समावेश आहे. उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील आणि सेंद्रिय उत्पादने समाविष्ट.
- स्थानिक दोन सांस्कृतिक गट या कार्यक्रमादरम्यान लडाखी लोकनृत्य सादर करतील. हा गट जब्रो नृत्य आणि स्पाओ नृत्य सादर करणार आहे.

स्रोत: PIB
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी