Search This Blog

Monday, 19 August 2019

9 वर्षांच्या अद्वैत भारतीय याने आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत किलिमंजारो पर्वत यशस्वीरीत्या केला सर.

पुण्यातील 9 वर्षीय अद्वैत भारतीय याने आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत किलिमंजारो पर्वत यशस्वीरीत्या सर केला.
हा पर्वत सर करायला एकूण 7 दिवस लागले. 31 जुलै 2019 ला अद्वैत किलिमंजारो डोंगराच्या शिखरावर पोहोचला. समीर पाठम यांच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पडली. अद्वैत वयाच्या केवळ 6 व्या वर्षी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत गेला होता. यानंतर अद्वैतची युरोपमधील माउंट एल्ब्रसवर चढण्याची योजना आहे.
माउंट एल्ब्रस ची उंची 5642 मिटर आहे. जॉर्जियाच्या सीमेजवळील दक्षिणी रशियामध्ये असलेल्या काकेशस पर्वतावर हे एक सुप्त ज्वालामुखी आहे.

माउंट किलिमंजारो
  • माउंट किलिमंजारो हा आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत आहे.
  • त्याची उंची 19,341 फूट (5,895 मीटर) आहे.  ● हा पर्वत टांझानिया मध्ये स्थित आहे.
  • हंस मेयर आणि लुडविग पुर्तशेलर यांनी 1889 मध्ये प्रथम या पर्वताच्या शिखरावर पोहोचले.
स्रोत : इंडिया टुडे, टाइम्स ऑफ इंडिया,IBT,

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी