Search This Blog

Wednesday, 21 August 2019

अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड अँबेसिडर

 • ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना स्वच्छ भारत मिशनचं ब्रँड अँबेसिडर करण्यात आलं आहे.
 • राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबन लोणीकर यांनी ही घोषणा केली.
 • स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी अशोक सराफ यांना ब्रँड अॅम्बेसिडर करण्यात आलं आहे.
 • २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
 • २ ऑक्टोबर २०१९ ऐवजी १८ एप्रिल २०१८ रोजीच ग्रामीण महाराष्ट्र हागणदारी मुक्त घोषित करण्यात आला.
 • ३४ जिल्हे, ३५१ तालुके व २७ हजार ६६७ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित करण्यात आल्या आहेत.
 • स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी यापुर्वी चार हजार रुपये इतके अनुदान देण्यात येत होते. परंतु आता बारा हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. गेल्या पाच वर्षात ६० लाख शौचालये बांधण्यात आली,
 • स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी आणि ग्रामीण जनतेच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी अभिनेते अशोक सराफ यांची मदत होणार
 • स्वच्छ सर्वेक्षण २०१८ (ग्रामीण) मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात सर्वांत स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळवला होता .

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) : 

 • सार्वत्रिक स्वच्छता कव्हरेजचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी व स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांनी 2 ऑक्टोबर २०१4 रोजी स्वच्छ भारत अभियान सुरू केले.
 • महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली म्हणून ग्रामीण भागातील स्वच्छतेची पतळी सुधारण्यासाठी 2019 पर्यंत स्वच्छ भारतचे ध्येय साध्य करण्याचे ठरवले आहे .
 • ग्रामीण भागातील घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या पातळीत वाढ होईल आणि गावे हागणदारी मुक्त (ODF) होऊन स्वच्छ आणि शुद्ध बनतील .

स्रोत : सकाळ, लोकसत्ता , http://swachhbharatmission.gov.in

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी